शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ऑनलाईन लुबाडण्यात आलेले ४५ हजार रुपये पोलिसांमुळे परत

By शरद जाधव | Updated: September 20, 2022 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील एका माजी सैनिकाच्या बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यात आलेले ४५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील एका माजी सैनिकाच्या बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यात आलेले ४५ हजार रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. एका ऑनलाईनपध्दतीने व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही लूट करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी याचा पूर्ण तपास करत पैसे परत मिळवून दिल्याने माजी सैनिकाने समाधान व्यक्त केले.वीजबिल न भरल्यास वीजजोडणी तोडण्याचा फोन करुन भामट्याने या माजी सैनिकाला जाळ्यात ओढले होते. यात त्यांनी आपल्या क्रेडीट कार्डाची माहिती दिली होती. यानंतर चोरट्याने या कार्डव्दारे ४५ हजार रुपयांची खरेदी केली होती. याबाबतचा मेसेज येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्याचा माग काढणे व पैसे परत मिळवून देणे हे मोठे दिव्य असते. तरीही पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरु केला.पोलिसांनी या व्यवहारात बँकेच्या व्यवहारातील दिरंगाई, गाफिलपणा आणि ऑनलाईन व्यवहार कंपनीच्या हलगर्जीपणा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. अखेर ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने ग्राहकाला पैसे परत करण्याचे कबूल केले. त्यांनी बँकेकडे पैसे वर्ग केले आणि ग्राहकाला पैसे मिळाले. ऑनलाईन फसवणूक झाल्यास ते पैसे गेल्यातच जमा अशी समजूत सर्वसामान्यांची झाली असताना सायबर पोलिसांनी मात्र, ते मिळवून दिल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.