शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

PM आवास योजनेचे पैसे खात्यावर येताच ४ महिला प्रियकरांसोबत पळाल्या; पती हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:23 IST

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. त्यात पहिला हफ्ता ५० हजार रुपये दिला जातो.

बाराबंकी - उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथं पंतप्रधान आवास योजनेतंर्गत ४ महिलांना योजनेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपये मिळाले. महिलांच्या खात्यात ५० हजार जमा होताच या चार महिला पतीला सोडून प्रियकरांसोबत पसार झाल्यानं गावात खळबळ माजली. संबंधित प्रकाराबाबत पीडित पतीने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तेव्हा तेदेखील हैराण झाले. जिल्हा नगरविकास अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर बांधकाम न झालेल्या ४० लाभार्थ्यांना नोटीस जारी करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या पतीने या प्रकाराचा खुलासा केला. त्याचसोबत योजनेचा दुसरा हफ्ता रोखावा अशी मागणीही त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता हफ्ता पाठवू नका असं ४ महिलांच्या पतीने पत्रात मागणी केलीय. कारण त्यांच्या पत्नी पहिला हफ्ता मिळताच प्रियकरासोबत पसार झाल्यात. 

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जातात. त्यात पहिला हफ्ता ५० हजार रुपये दिला जातो.  नगर विभागाने सिद्धौर, रामनगर, बेलहराच्या ४ महिलांच्या खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपये पाठवले. सरकारनं पैसे पाठवल्यानंतर विभागाने सर्वांना नोटीस पाठवून तात्काळ बांधकाम सुरू करा असा आदेश दिला होता. परंतु जेव्हा नोटीस मिळाली तेव्हा पसार झालेल्या महिलांच्या पतीने विभागाला हा प्रकार कळवला. त्यामुळे या महिलांकडून पैसे वसूल कसे करायचे याची चिंता अधिकाऱ्यांना लागली आहे. 

अनेक लाभार्थ्यांनी पैसे घेऊनही घरं बांधली नाहीतया प्रकरणातील विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पंतप्रधान आवास योजनेचे जिल्हा समन्वयक शिवम विश्वकर्मा म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेसाठी १६ हजार लाभार्थ्यांना पहिला हफ्ता देण्यात आला आहे. त्यातील ४० जणांनी पैसे मिळूनही बांधकाम सुरू केले नाही. जेव्हा तपासणी केली तेव्हा ४ अशी प्रकरणे मिळाली ज्यात पैसे घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना