शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लग्नाच्या आमिषाने ३५ तरुणींना गंडा; कल्याणमधील ठकसेनाला अटक, क्राईम ब्रँचची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:17 IST

गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-७च्या पथकाने त्याला शिताफीने अटक केले आहे

मुंबई : सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल बनवून एका उच्चशिक्षित  ठकसेनाने तब्बल ३५  तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशाल सुरेश चव्हाण ऊर्फ अनुराग चव्हाण (३०) असे या भामट्याचे नाव असून लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-७च्या पथकाने त्याला शिताफीने अटक केले आहे. चव्हाणने  बी टेक व एमबीएची पदवी घेतली आहे. माहिती तंत्रज्ञानातील कौशल्याच्या आधारे त्याने  इन्स्ट्राग्राम फेसबुक, जीवनसाथी आदी वेबसाईटवर वेगवेगळी प्रोफाइल बनवून श्रीमंत आणि उद्योगपती  असल्याचे भासवत गेल्या काही वर्षांपासून हा उद्योग सुरू ठेवला होता. ओळख पटू नये, यासाठी तो वेगवेगळे मोबाईल वापरत होता. त्याचे एसडीआरमध्ये खोटे पत्ते नोंदविले होते.कांजुरमार्ग परिसरातील एका २८ वर्षाच्या तरुणीशी लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून अनुरागने नोव्हेंबरमध्ये जवळीक वाढवली. त्यानंतर एका व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहण्याने  अभुदय बँकेतील खात्यावर अडीच लाख भरण्यास सांगितले. त्यानंतर तो तिला टाळू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली. याबाबत क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. वेगवेगळ्या ॲप्स, साईटची तपासणी करून  त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. त्याच्याबाबत  माहिती मिळविल्यानंतरही तो महिनाभर पोलिसांना चकवा देत होता. अखेर कल्याणमधील  श्रद्धा महल येथील एका फ्लॅटमध्ये लपून राहिला होता. फ्लॅट बंद असल्याचे भासवण्यासाठी त्याने   बाहेरून लॉक लावले होते. मात्र पोलिसांनी कौशल्याने त्याचा छडा लावला.पोलीस अधिकारी बनला डिलिव्हरी बॉयअनुरागला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी एका हॉटेलचा डिलिव्हरी बॉय बनले. त्यासाठी आरोपीने ऑर्डर दिलेले पार्सल घेऊन त्या ते फ्लॅटमध्ये गेले. पार्सल घेण्यासाठी तो बाहेर आल्यानंतर त्याला पकडले.अनुराग, विशाल नाव वापरून त्याने ३५ मुलींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यांना व्यवसायात भागीदार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने जवळपास २० लाख रुपये उकळले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे लेटेस्ट आयफोन मिळवून देण्याचा बहाण्याने सुमारे २५ लाखाला गंडा घातला असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.