जळगाव : सेवानिवृत्तीची रक्कम विमा कंपनी गुंतवल्यास चार वर्षांत दाम दुप्पट होईल, असे आमिष दाखवून रमेश गबा देवरे ( रा. अक्कलकोट हौसिंग सोसायटी, खोटे नगर) व त्यांचा मुलगा सुनील यांना ३३ लाख २० हजार ५७२ रुपयाचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी मंगळवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सेवानिवृत्त कृषी सहाय्यकला ३३ लाखाचा गंडा; विमा कंपनीत दाम दुप्पटीचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 13:29 IST