नवी दिल्ली : 81 वर्षांच्या वृद्धाचा गेटअप करून न्यूयॉर्कला जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 32 वर्षांच्या युवकाला सीआयएसएफने विमानतळावर पकडले. त्याने दाढी, केस पांढरे केले होते. धक्कादायक म्हणजे त्याने इमिग्रेशनच्या डोळ्यांत धूळ फेकत क्लिअरन्सही मिळविला होता. हा युवक अहमदाबादचा राहणारा आहे. सीआयएसएफने त्याला पोलिसांच्या हवाली केला आहे.
सीआयएसएफने सांगितले की, आरोपी जयेश पटेल हा 81 वर्षांच्या वृद्धाचे रुप घेऊन अमरीक सिंह या नावावर न्यूयॉर्कला जात होता. त्याने वृद्ध दिसण्यासाठी केस पांढरे करण्यासोबत झीरो नंबरचा चष्माही घातला होता. तो व्हीलचेअरवर होता. टर्मिनल-3 वर अंतिम सुरक्षा तपासणी करण्यासाठी त्याला खुर्चीतून उठायला सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. तसेच वरिष्ठ निरिक्षक राजवीर सिंह यांच्यासोबत बोलताना डोळ्यात डोळे घालत नव्हता. यामुळे त्यांना संशय आला.