शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कवडीपाटजवळ ३० लाखांचा गुटखा जप्त, ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:31 IST

कदमवाकवस्ती येथील कवडीपाट (ता. हवेली) टोलनाक्यावर सोलापूरच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा लोणी काळभोर पोलिसांनी पकडला.

कदमवाकवस्ती - येथील कवडीपाट (ता. हवेली) टोलनाक्यावर सोलापूरच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा लोणी काळभोर पोलिसांनी पकडला.लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.६) रोजी सकाळी सातच्या सुमारास कवडीपाट कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे सोलापूरकडून पुण्याकडे एक शेंदरी रंगाचा आयशर टेम्पो (टीएस १२, यूए ५५७२) यामध्ये अवैध गुटखा पान मसाल्याची वाहतूक करीत आहेत, अशी बातमी मिळाली.बातमी मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि लोणी काळभोर पोलीस पथक यांनी कवडीपाट टोलनाका येथे सापळा लावला. सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापूरकडून पुणे बाजुकडे सदरचा टेम्पो आला असता त्यास ताब्यात घेवून त्याची पाहणी केली. असता सदर टेम्पोमध्ये एकूण २९ लाख ६६ हजार रुपयांचा गुटखा सापडला. टेम्पो ड्रायव्हर शमीम अब्दुलवाहीद अहमद (वय ३२, रा. कोकटपल्ली हबीबनगर, हैदराबाद) यास सदर टेम्पो व मालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.कारवाईमध्ये २९ लाख ६६ हजार रुपयांचा अवैध गुटखा व १२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ४१ लाख ६६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड अप्पर पोलीस अधीक्षक, संदीप जाधव, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेश ढवाण, पोलीस नाईक समीर चमन शेख, सचिन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल परशराम सांगळे, सागर कडू यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी