शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत NCB च्या कारवाईचं प्रकरण ताजं असतानाच उरी सेक्टरमध्ये ३० कोटींचं ड्रग्ज जप्त, तस्कर पळाले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:57 IST

मुंबईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षानं (एनसीबी) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे भारतीय सीमेवरुन देखील मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षानं (एनसीबी) क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे भारतीय सीमेवरुन देखील मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलोग्रॅम हिरोईन आणि इतर ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत जवळपास ३० कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. 

भारतीय सैन्याच्या संयुक्त सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. शनिवारी रात्री उशिरा एलओसीजवळ उत्तर काश्मीर भागात उरी शहरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. बारामुल्लाच्या एसएसपी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाला एलओसीजवळ काही संशयित घडामोडींची माहिती मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत ३० किलो वजनाचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज पेडलर भारतीय सेनेच्या हालचालींवर दूरवरून लक्ष ठेवून होते. भारतीय सैन्याच्या जवानांना पाहताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. भारतीय सैन्याच्या जवानांनी ड्रग्ज साठा जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे. 

मुंबईतही एनसीबीची मोठी कारवाईमुंबईत एका क्रूझवर एनसीबीनं विशेष मोहिम राबवत मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावली आहे. यात आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये बड्या उद्योगपतींच्या मुला-मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणाबाबत त्याचीही कसून चौकशी केली जात आहे. आर्यन खान देखील या क्रूझ पार्टीत उपस्थित होता. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोIndian Armyभारतीय जवान