शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटींचे जीएसटी रॅकेट उद्ध्वस्त; राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 06:24 IST

बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांतून बनावटरित्या ३० कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट प्राप्त केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या तीनही कंपन्यांनी बनावटरित्या पैसे पदरात पाडून घेण्यासाठी एकूण २७ बोगस कंपन्या स्थापन केल्याचीही माहिती उजेडात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी पहिल्या प्रकरणात एका जीएसटी कर व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव सौरभ बुराड असे आहे. त्याने, ९ बोगस कंपन्याची स्थापना करत व त्यांची जीएसटी प्रमाणपत्रासाठी बनावटरित्या नोंदणी केली होती. बोगस व्यवहार दाखवत त्यावर त्याने १० कोटी ३६ लाख रुपये इनपुट क्रेडिटपोटी प्राप्त करून घेतले. तर दुसऱ्या प्रकरणात मे. मॅजिकगोल्ड कंपनीची संचालक भारती कोठारी हिने देखील याच पद्धतीने बनाव रचत १६ कोटी ९७ लाख रुपयांचे बनावट जीएसटी इनपूट क्रेडिट मिळवले होते. 

१० नोव्हेंबरपर्यंत कोठडी

  • तिसऱ्या प्रकरणात, अरुण चव्हाण नावाच्या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याने बनावट व्यवहारांची बिले सादर करत ११ कोटी १० लाख रुपये मिळवले होते. 
  • या तीनही प्रकरणात प्रत्येकाने ९ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्याद्वारे व्यवहार झाल्याचे दाखवत हे पैसे सरकारी तिजोरीतून लाटले आहेत. या तिघांनाही अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
टॅग्स :ArrestअटकGSTजीएसटी