शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तळपायाची आग मस्तकात जाईल; ३ महिन्याच्या चिमुरडीला गरम लोखंडी रॉडने दिले ५१ चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 23:01 IST

या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

शहडोल - मध्य प्रदेशच्या शहडोल इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी ३ महिन्याच्या चिमुरडीला न्यूमोनियामुळे उपचारासाठी संताप आणणारा प्रकार केला आहे. अंधविश्वासामुळे मुलीच्या पोटावर जवळपास ५१ वेळा गरम रॉडचे चटके देण्यात आले. ज्यामुळे मुलीची अवस्था खराब झाली. या घटनेनंतर नातेवाईकांनी तात्काळ तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. 

या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर कथौटिया येथील आहे. जिथे ३ महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी अंधश्रद्धेपोटी घरच्यांनी तिला भोंदूबाबाकडे नेले. जिथे भोंदूबाबानं मुलीवर एक-दोनदा नव्हे तर ५१ वेळा चटके दिले. त्यामुळे मुलीची प्रकृती ढासळली.

उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू या मुलीवर उपचार करण्याऐवजी तिला भोंदूबाबाने गरम लोखंडी रॉडनं चटके देण्यात आले असं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलीची प्रकृती अधिकच बिघडली. न्यूमोनियाचा संसर्ग मेंदूमध्येही पसरला. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

तपासाचे आदेशयाप्रकरणी शहडोलच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकेने नवजात मुलीच्या आईची दोनदा समजूत काढली होती, मात्र तरीही मुलीला गरम लोखंडी रॉडने चटके देण्यात आले. हा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु चटके दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात पोहोचले असता त्यांना ही घटना १५ दिवस जुनी असल्याचे समजले. जिथे मुलीला न्यूमोनियामुळे झाला होता. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असं सांगितले.