शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत ३ कोटींचे ड्रग्ज जप्त; २३ तस्कर अटकेत, मुंबई पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 07:38 IST

पोलिसांच्या कारवाईत ८४९ ग्रॅम एमडी, सव्वा किलो चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन आणि २८० ग्रॅम गांजा आदी ड्रग्स जप्त करण्यात आले.

मुंबई : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन आठवडयांत शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत एमडी, चरस, हेरॉईनसह सुमारे ३ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत पथकाने एकूण १५ गुन्हे नोंदवत २३ ड्रग्स तस्कर, विक्रेत्यांना अटक केली. पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त मुद्देमाल...पोलिसांच्या कारवाईत ८४९ ग्रॅम एमडी, सव्वा किलो चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन आणि २८० ग्रॅम गांजा आदी ड्रग्स जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अमली पदार्थांचे राज्य, परराज्यांतील स्रोत आणि तस्कर टोळीतील अन्य साथीदारांबाबत कसून चौकशी सुरू आहे.

१२ तासांत...  गेल्या १२ तासांत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली, वरळी आणि आझाद मैदान कक्षातील अधिकाऱ्यांनी उपलब्ध गोपनीय माहिती आधारे शहरातील विविध भागांत सापळे रचले होते. 

दहिसर : कांदरपाडा भागातून दोन तरुणांना ७७ ग्रॅम एमडीसह अटकमाझगाव : परिसरातून अन्य एका तरुणास ४६ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. ट्रॉम्बे : चिता कॅम्प परिसरात ई-सिगारेटची खुलेआम विक्री करणाऱ्या दुकानावर छापा घालण्यात आला. त्यात पाच लाख रुपये किंमतीच्या ३०१ ई सिगारेट, ४०२ वापरलेले रिकामे ई सिगारेट, १३० ई. सिगारेट बॅटरी-फिल्टर, ३०३ ई सिगारेट फ्लेवर, ९ ई सिगारेट बॅटरी चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

७१ लाखांचा एमडी जप्त गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने गुरुवारी अंधेरीतून दोघांना अटक करत ७१ लाख किमतीचा एमडी साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसDrugsअमली पदार्थ