शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘क्राइम शो’ पाहून 3 मुलांनी केली मित्राची हत्या; खून करून मृतदेह पॉलिथिनच्या पिशवीत भरला, प्रेमसंबंधांचाही अँगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:01 IST

पोलिसांनी सांगितले की, तिघांनी सायकलच्या साखळीने मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर दगडाने त्याचे डोके फोडले आणि रविवारी धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश आहे.

भोपाळ : तीन मुलांनी त्यांच्या १२ वर्षांच्या मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका खेड्यात घडला. विशेष म्हणजे या अल्पवयीन आरोपींचे वय १६, १४ आणि ११ असून, त्यांनी हे कृत्य स्थानिक ‘क्राइम शो’च्या प्रभावाखाली येऊन केले. आपल्या मोठ्या बहिणीचे आरोपींपैकी एकाशी कथित प्रेमसंबंधांना विरोध केल्याने ही हत्या झाल्याचेही सांगण्यात आले.पोलिसांनी सांगितले की, तिघांनी सायकलच्या साखळीने मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर दगडाने त्याचे डोके फोडले आणि रविवारी धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश आहे.

‘ब्रेकअप’ची भीती...- १६ वर्षांचा आरोपी ‘रोमँटिक शो’ पाहत मोठा झाला. ज्याचा शेवट ब्रेकअपमध्ये होत असे. त्यामुळे त्याला आपले प्रेम गमावण्याची अर्थात ब्रेकअपची भीती वाटत असल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितलेे. - या मुलांना ब्रेकअप म्हणजे काय, हेही पुरेसे माहीत नसल्याचे पोलिसांना आढळले. ही मुले स्थानिक गुन्हेगारी कार्यक्रमांच्या प्रभावाखाली होती. त्यातूनच ब्रेकअप टाळण्यासाठी त्यांनी मुलाचा खून करण्याची योजना आखली. - स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारी कटाची शिक्षा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तीन मुलांना ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

बहिणीचा विनयभंग अन्...मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, ‘माझ्या मोठ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन मुलांवर माझ्या मुलाने आक्षेप घेतला होता. त्यांनी असे पुन्हा केले तर त्यांच्या पालकांना सांगेल, असा दम त्याने दिला होता.’ मृत मुलाच्या वडिलांची नुकतीच नोकरी गेली होती आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते पत्नी, १४ वर्षांची मोठी मुलगी आणि मुलासह राहत होते.

दुपारी घरातून गेला, तो परतलाच नाही...‘रविवारी दुपारी मुलगा १ वाजता घरातून निघून गेला. आम्हाला वाटले की, तो गावात खेळण्यासाठी गेला आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास, त्यांच्या शेजाऱ्याने त्या मुलाच्या पालकांना घराजवळील खड्यांच्या ढिगाऱ्यावर टाकलेल्या पॉलिथिनची पिशवी दाखवली. त्यात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यात नायलॉनच्या दोरीसह सायकलची साखळी बांधलेली होती. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते आणि नाकावर, कपाळावर मारहाणीच्या खुणा होत्या,’ असे मुलाच्या वडिलांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.