शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

७६ अब्जाची नोट घेऊन शोधत होते सावज; आंध्रातील तिघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:16 IST

मोठे रॅकेट असण्याची शक्यता

नांदेड : भारतीय चलनात तब्बल ७६ अब्ज रुपये किंमत असलेली १ बिलियन डॉलरची नोट देण्याचे आमिष दाखवून गंडविण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुद्वारा परिसरातून अटक केली. पाचपैकी तिघे अटकेत असून, दोघे जण फरार झाले आहेत. आंध्रातील हे आरोपी वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रातील नागरिकांना फसविण्याचे फंडे वापरत आहेत. आंध्रातील पाच जण नांदेडात बनावट विदेशी चलन घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली होती. त्यानंतर, सपोनि पांडुरंग भारती हे या आरोपींच्या मागावर होते. गुरुद्वारा परिसरात एक बिलियन डॉलरची नोट देऊन भारतीय चलन घेण्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने महेश इल्लय्या वेल्लूटला रा.सर्वापूर जि.कामारेड्डी, नंदकिशाेर गालरेड्डी देवारमरा रा.इब्राहिमपेठ आणि आनंदराव अय्यन्ना गुंजी रा.नेकूनबाबू या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या जवळील एक बिलियन डॉलरची बनावट नोट जप्त करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुरुद्वारा परिसरात शोधत होते मध्यस्थ गुरुद्वारा परिसरात हे आरोपी एका मध्यस्थाच्या शोधात होते. गुरुद्वारात एक बिलियन डॉलरची नोट दानात आली असून, अमेरिकेत जाऊन ती वठवून घ्यावी. त्या बदल्यात भारतीय चलनात काही रक्कम उकळण्याचा त्यांचा डाव होता, परंतु त्यासाठी त्यांना कुणीच मध्यस्थ मिळाला नाही. मध्यस्थाचा शोध सुरू असतानाच ते पोलिसांच्या हाती लागले. पैशांचा पाऊस, गुप्तधनाचे व्हिडीओ आरोपींकडून पोलिसांनी मोबाइल जप्त केले आहेत. त्यामध्ये लोकांना गंडविण्यासाठी ते अनेक फंडे वापरत असल्याचे दिसून आले. त्यात पैशांचा पाऊस पाडणे, गुप्तधन शोधून देणे, मांडुळाचा प्रयोग यासह झटपट पैसे कमाविण्याचे अनेक व्हिडीओ त्यांनी तयार केले होते. हे व्हिडीओ लोकांना दाखवून अगोदर त्यांचा विश्वास संपादन करावयाचा अन् नंतर गंडवायचे, असा त्यांचा प्लान होता. यामागे मोठे रॅकेट असल्याचे सपोनि पांडुरंग भारती यांनी सांगितले.