शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चीनने खोडा घातल्याने २६/११चा सूत्रधार साजिद आजही मोकाटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 05:36 IST

पाकिस्तानी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला

संयुक्त राष्ट्र : अमेरिका व भारताने लष्कर ए तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला काळ्या यादीत टाकण्याचा संयुक्त राष्ट्रांत मांडलेला प्रस्ताव चीनने रोखला. भारत आणि अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेत चीनने अडथळा आणण्याची चार महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे. मीर हा २००८च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असून, भारताला सर्वाधिक हव्या असलेल्या दहशतवाद्यांत त्याचा समावेश होताे.   

पाकिस्तानी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला. या हल्ल्याचा मीर हा प्रमुख सूत्रधार असल्याने अमेरिकेने त्याच्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवलेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या  समिती अंतर्गत मीरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून काळ्या यादीत टाकावे, असा प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. भारताचा पाठिंबा असलेला हा प्रस्ताव चीनने गुरुवारी रोखल्याचे समजते . या प्रस्तावांतर्गत मीरची मालमत्ता जप्त करण्यात आली असती व तसेच त्याच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असते. 

पाकिस्तान पॅरिसस्थित फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या राखाडी यादीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळेच पाकमधील कोर्टाने गेल्या जूनमध्ये दहशतवादास वित्त पुरवठाप्रकरणी मीरला १५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पाकने मीरचा मृत्यू झाल्याचा दावा मागे केला होता. पण पाश्चात्य देशांनी  हा दावा फेटाळत पुरावे मागितले होते. मीर हा २००१पासून पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा ज्येष्ठ सदस्य असून, २६/११च्या हल्ल्यातील सहभागाबद्दल तो भारताला हवा आहे. 

आडकाठी करण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न पाकमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ अब्दुल रऊफ अझहर याला काळ्या यादीत टाकण्याचा भारत आणि अमेरिकेचा युएनमधील प्रस्ताव चीनने गेल्या महिन्यात रोखला. चीन हा पाकिस्तानचा मित्र असल्याने निर्बंध समिती अंतर्गत दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याचे प्रस्ताव वारंवार रोखत आहे. गेल्या जूनमध्येही चीनने शेवटच्या क्षणी दहशतवादी अब्दुल रेहमान मक्कीला काळ्या यादीत टाकण्याचा संयुक्त प्रस्ताव रोखला होता. मक्की हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदचा मेहुणा आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाchinaचीनPakistanपाकिस्तान