शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२५ तरुणींची फसवणूक : ‘लखोबा लोखंडे’ला कल्याणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:17 IST

विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण - विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. शुभांकर स्वत: आयटी इंजिनीअर असून तो मूळचा बंगळुरू येथील रहिवासी आहे. आतापर्यंत शुभांकरने फसवलेल्या तीन तरुणी समोर आल्या असल्या, तरी प्राथमिक माहितीनुसार त्याने जवळपास २५ तरुणींना गंडा घातल्याचे समोर येत आहे. आरोपीने तीन मुलींकडून ३७ लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली.शुभांकर हा विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून इंजिनीअर तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्या चांगल्या कंपनीत कामाला असतात आणि त्यांचा पगारही जास्त असतो. त्यामुळे शुभांकर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. नंतर, काही ना काही समस्या सांगून किंवा ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. या भामट्याने कल्याणमधील एका इंजिनीअर तरुणीकडून साडेसहा लाख रुपये उकळले होते. त्याने तिचा विनयभंगही केला. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी शुभांकरला बेड्या ठोकण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, पीडित तरुणीने त्याला एक लाख रुपये देण्यासाठी बोलवून घेतले. पैशांच्या हव्यासापोटी कल्याणमध्ये आलेल्या शुभांकरला अटक केली. बंगळुरूच्या तरुणीकडून २० लाख, तर कोलकात्याच्या तरुणीकडून १० लाख रुपये उकळले आहेत.आरोपी बंगळुरूचाशुभांकरचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि सोज्ज्वळ आहे. याचाच गैरफायदा घेत तो तरुणींना जाळ्यात फसवायचा. तो मूळचा बंगळुरूचा राहणारा आहे. आपण दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) अधिकारी असून इथिकल हॅकर असल्याचेही जाळ्यात फसलेल्या तरुणींना तो सांगायचा. शुभांकर हा मुख्यत: बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईतील तरुणींना फसवायचा.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे