शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम विभागाकडून दाबोळी विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून २२ लाखाचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:34 IST

दाबोळी विमानतळावर सारजाहून आलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडे मंगळवारी (दि. ३०) पहाटे  ७५५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याची बिस्किटे सापडली.

वास्को: दाबोळी विमानतळावर सारजाहून आलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडे मंगळवारी (दि. ३०) पहाटे  ७५५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याची बिस्किटे सापडली. हा प्रवासी मूळचा केरळमधील रहिवाशी असून त्यांने तस्करी करून आणलेल्या या सोन्याची किंमत २२ लाख ४ हजार रुपये असल्याची माहिती कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र पी यांनी दिली.

मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. एअर अरेबियाचे ‘जी ९०४९२’ हे विमान सारजाहून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर या विमानातून आलेल्या प्रवाशांची कस्टम विभागाकडून तपासणीस सुरवात करण्यात आली. तपासणीच्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना या विमानातून आलेल्या एका प्रवाशावर संशय आल्याने त्यांनी सुरुवातीला त्याच्याशी विचारपूस केली असता त्याच्याकडून योग्य उत्तरे देण्यात येत नसल्याचे जाणविल्याने त्याच्यावरचा संशय आणखी वाढला. यानंतर कस्टम अधिका-यांनी त्या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता त्यांने लपवून आणलेली तीन सोन्याची बिस्किटे त्यांना आढळून आल्या. तीनही बिस्किटांची एकूण वजन ७५५ ग्रॅम असल्याची माहिती सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र यांनी दिली. तसेच, या सोन्याची किंमत २२ लाख ४ हजार ५९२ रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एप्रिल २०१८ पासून सहा महिन्यात दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने विविध कारवाईत एकूण ५ किलो ७५० ग्रॅम इतके तस्करीचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम १ कोटी ७० लाख रुपये असल्याची माहिती कस्टमचे सहाय्यक कमिश्नर डॉ. राघवेंद्र यांनी दिली. तसेच कस्टम विभागाने विविध कारवाईत मागच्या सहा महिन्यात विविध प्रवाशांकडून ३६ लाख ३८ हजार रुपयांची विदेशी चलने जप्त केली असून ३८ लाख ०९ हजार रुपयांचे विदेशी सामान मागच्या सहा महिन्यात दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने जप्त केले आहे.

टॅग्स :goaगोवा