शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 07:13 IST

ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई : पितापुत्र अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी पितापुत्राच्या मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पितापुत्राला अटक करण्यात आली असून, २२ कोटी रुपयांच्या जीएसटीच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेंट्रल इंटेलिजन्स युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे सीजीएसटी विभागाने कारवाई करत दोन व्यावसायिकांना अटक केली. अटक करण्यात आलेले दोघे हे नात्याने पितापुत्र आहेत. या दोघांच्या मे. शाह एंटरप्रायझेस आणि मे. यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगवेगळ्या फर्मचे कार्यालय मुंबईतील कांदिवली येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. ११.८० आणि १०.२३ कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेऊन आणि पुढे देण्यात या कंपन्या गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा २०१७च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट आईटीसी बनावट संस्थांकडून मिळवत होत्या आणि ते या इतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. दोघांना सीजीएसटी कायदाचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती ठाणे सीजीएसटी विभागाकडून देण्यात आली. 

प्रामाणिक करदात्यांशी स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि करचुकवेगिरी फसवणूक करणाऱ्या बनावट आयटीसी नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम तीव्र करणार आहे.- राजन चौधरी, आयुक्त सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क 

टॅग्स :GSTजीएसटी