शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याचे धमकावून खंडणी उकळणाऱ्याला २  जणांना अटक

By धीरज परब | Updated: January 28, 2023 20:04 IST

 दीपक हॉस्पिटल लगतच्या मार्गावर श्री राज एन्क्लेव या इमारतीतल्या एका घरात पोलीस असल्याचे सांगत दोघेजण घुसले .

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड :-  पोलीस असल्याचे धमकावून ४० हजार  रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन भामट्याना भाईंदर पूर्व भागातून नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

 दीपक हॉस्पिटल लगतच्या मार्गावर श्री राज एन्क्लेव या इमारतीतल्या एका घरात पोलीस असल्याचे सांगत दोघेजण घुसले . त्यावेळी घरत राहणारी तरुणी भाविका, तिची आई तुलसी पुरोहित व परिचित यांच्या कडे चौकशी करू लागले.  तुम्ही घरात वेश्या व्यवसाय चालवत आहात, खाली पोलिसांची गाडी उभी असून त्यात महिला पोलीस असल्याचे सांगत त्यांना गुन्हा दाखल करण्याची व सोसायटी मध्ये बदनामी करण्याची धमकी देत ५ लाखांची मागणी दोघांनी केली . 

पोलीस असल्याने घाबरून तरुणीने तिचे दागिने सराफा कडे गहाण ठेऊन ४० हजार रुपये दिले . त्या दरम्यान तिने बहिणीला कॉल करून पोलिस ठाण्यात कळवण्यास सांगितले .  नवघर पोलिसांनी पुरोहित यांच्या घरी जाऊन तेथे असलेल्या एका तोतया पोलिसाला अटक केली . तर पैसे घेऊन भाविका सोबत परत असलेल्या तोतयास सुद्धा पोलिसांनी पकडले . सुदर्शन खंदारे व जितेंद्र पटेल असे अटक केलेल्या खंडणीखोर तोतया पोलिसांची नावे आहेत.  

 

टॅग्स :Policeपोलिस