शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळ हत्याकटात २ वकीलही, ८ आरोपींना अटक; सीसीटीव्हीमध्ये गोळ्या झाडतानाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 06:01 IST

दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: गँगस्टर शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करणारा साहिल पोळेकरसह त्याला मदत करणाऱ्या आठजणांना अटक करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी साहिलने मामासह कट रचून मोहोळचा गेम केल्याचे उघड झाले असून, या कटात दोन वकिलांचाही हात असल्याचे पुढे आले आहे.साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, अमित मारुती कानगुडे, नामदेव महिपत कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, ॲड. रवींद्र वसंतराव पवार आणि ॲड. संजय रामभाऊ उडान यांना अटक झाली. वकिलांना ८ व बाकी आरोपींना १० जाने.पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

आरोपी पळत होते कोल्हापूरकडे 

घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली. आरोपी एका स्विफ्ट गाडीतून कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. आठ आरोपींकडून ३ पिस्टल, ३ मॅगझिन, ५ जिवंत काडतुसे, ८ मोबाइल आणि गाडी असा २२ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दबा धरून बसले होते...

नामदेव कानगुडे व त्याचा भाचा मुन्ना कोळेकर याच्याशी शरदचा वाद झाला. तेव्हापासून मोहोळचा काटा काढण्याची संधी तो शोधत होता. शुक्रवारी शरदच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या कार्यालयातून खाली आला. साहिल खाली उभा होता. त्याने व २ साथीदारांनी शरदवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला.

मामा-भाचे सूत्रधार

मोहोळ खून प्रकरणात मुन्ना पोळेकर आणि नामदेव ऊर्फ मामा कानगुडे हे मुख्य सूत्रधार आहेत. कानगुडे हा पोळेकर याचा मामा लागतो. पोळेकरशी जमीन खरेदी व्यवहारातून मोहोळचे वाद झाले होते. कानगुडे याच्याशीही मोहोळचे वाद झाले होते. तेव्हापासून मोहोळचा काटा काढण्यासाठी काही महिन्यांपासून ते तयारी करत होते. त्यासाठी त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पिस्तूल खरेदी केली होती.

टॅग्स :Arrestअटक