शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ४५ लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 10:02 IST

‘ॲग्रीमेंट फॉर सेल’मधील तरतुदीचा अप्रामाणिकपणे भंग करून फ्लॅट खरेदीपोटी दिलेल्या दोन कोटी ४५ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : खरेदी केलेल्या फ्लॅटचा मुदतीत ताबा दिला नाही व फ्लॅट खरेदीसाठी केलेल्या ‘ॲग्रीमेंट फॉर सेल’मधील तरतुदीचा अप्रामाणिकपणे भंग करून फ्लॅट खरेदीपोटी दिलेल्या दोन कोटी ४५ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेक्टर ६, वाशी येथील सोमेश प्रशांत कुमार बॅनर्जी यांनी २०१५ मध्ये तळोजा फेस टू, सेक्टर २६ येथे अर्जुन रेसिडेन्सी या प्रोजेक्टवर गेले असता, त्यांना सात मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसले. यावेळी बिल्डर विजय भतीजा यांनी प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असून, विविध प्राधिकरणांच्या परवानग्या प्राप्त झाल्याचे सांगितले व २०१६ मध्ये प्रोजेक्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बॅनर्जी यांनी वन बीएचके फ्लॅट बुक करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी एक लाख ४० हजार रुपये दिले. फ्लॅटचे ॲग्रीमेंट करण्यात आले. त्यानंतर, फ्लॅटवर होम लोन घेतले. तत्पूर्वी एप्रिल, २०१५ मध्ये बॅनर्जी यांनी भतीजा यांच्या व्हीएम इन्फ्रा, शहापूर येथे रुबी नावाच्या दुसऱ्या बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये वन बीएचके फ्लॅट बुकिंगपोटी ४ लाख वीस हजार दिले होते. शहापूर येथील बुकिंग रद्द करून ही रक्कम अर्जुन रेसिडेन्सी या प्रोजेक्टमध्ये गुंतविण्यात आली. 

फ्लॅटच्या खरेदीपोटी विजय भतीजा यांना एकूण २४ लाख ९६ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर जून, २०१८ मध्ये बिल्डिंगमधील फ्लॅट ४०४ साठी होम लोनची रक्कम व इतर असे एकूण २२ लाख ३२ हजार ३९५ रुपये देण्यात आले. बॅनर्जी यांनी भतीजा यांना असे एकूण तीन फ्लॅटच्या खरेदीपोटी ५१ लाख २१ हजार २९५ इतकी रक्कम दिलेली आहे. 

दुसऱ्या प्रकल्पात वापरले पैसेअर्जुन रेसिडेन्सी या बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या खरेदीपोटी बॅनर्जी यांच्यासह सात व्यक्तींनी मिळून एकूण दोन कोटी ४५ लाख ५७ हजार २६१ इतकी रक्कम बिल्डर भतीजा यांना दिली आहे. त्यांनी मुदतीत फ्लॅटचा ताबा दिला नाही व खरेदीपोटी दिलेले पैसे भतीजा याने त्याच्या इतर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी