शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं; आरोपीचा मृत्यू

By मुकेश चव्हाण | Updated: January 6, 2021 15:35 IST

 तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्ली: एका १९ वर्षीय तरुणीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. चाकूचा धाक दाखवून या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणाचा या सर्व झटापटीमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.  तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेतली असता तिथे या तरुणाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शवविच्छेदनासाठी हा मृतदेह स्टेनली रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तरुणी राहणाऱ्या लोकवस्तीपासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये शौचासाठी गेली होती. त्यानंतर तिच्याच गावात राहणारा २४ वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. त्यानंतर तरुणी खूप घाबरली. ही मुलगी पुढे काही करण्याआधीच या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे या मुलीने पोलिसांना सांगतिले. त्यानंतर तरुणीने मला जाऊ दे, मी कोणालाही काहीही सांगणार नाही अशी विनंती केली. हा तरुण स्वत:चे कपडे काढू लागला तेव्हा या मुलगी त्याच्याकडे गयावया करु लागली. मात्र तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

तरुणीला यानंतर तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू उचलून या मुलाने तरुणाच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी स्वत:च स्थानिक पोलीस स्थानकात पोहचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या या कृत्याचं सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक करण्यात येत आहे. 

पोलीस उपअधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी दहाव्या इयत्तेच्या परिक्षेची तयारी करत आहे. तसेच आरोपीला दोन मुलं असून तो या तरुणीच्या मावशीचा मुलगा होता. घरगुती वादामुळे काही महिन्यांपूर्वीच अजितकुमार त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला होता. आरोपी तरुण हा बेरोजगार आणि दारुचा व्यसन असलेल्यांपैकी होता. यापूर्वीही त्याच्याविरोधात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारDeathमृत्यूTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिस