शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळीतून साडेतीन कोटींचा १८०० किलो गांजा जप्त; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 02:31 IST

Crime News : याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आकाश सुभाष यादव (२५) व दिनेशकुमार सरोज (२६) अशी अटक आराेपींची नावे आहेत.

मुंबई : ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून मुंबईसह विविध ठिकाणी गांजाच्या तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) विक्रोळी परिसरात एका ट्रकमध्ये शहाळ्याखाली लपवलेला १८०० किलो गांजा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत ३ कोटी ६० लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आकाश सुभाष यादव (२५) व दिनेशकुमार सरोज (२६) अशी अटक आराेपींची नावे आहेत. मात्र, मुख्य सूत्रधार लक्ष्मीकांत प्रधान व संदीप सातपुते हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रधान हा ओडिशामधील भरामपूर (जि. गंजम) येथील असून तेथून तो भिवंडीतील गोदामात महिन्याला सरासरी ५ टन गांजा पाठवित होता. तेथून मुंबईतील सूत्रधार सातपुते हा गांजा मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, सुरत आदी भागात विक्रीसाठी पाठवत असे, असे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांनी सांगितले.विक्रोळी पोलीस ठाणे बस स्टॉपजवळ एका ट्रकमधून दोन तस्कर शुक्रवारी गांजा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर पथकाच्या प्रभारी निरीक्षक लता सुतार यांना मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक विशाल खैरे व पथकाने पाळत ठेवून टाटा ट्रक (एमएच ४८ एवाय ०८९३) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोण्यांत १८०० किलो गांजा आढळला.  दोघांना अटक करून चौकशी केली असता ओडिशातून गांजा आयात करीत असल्याची कबुली त्याने दिली.

शहाळ्याच्या आडून गांजाचा धंदाशहाळे आणायचे आहे, असे सांगून आराेपी भाड्याने ट्रक घेऊन जात. ठरावीक ठिकाणी ड्रायव्हरला एका हॉटेलात थांबायला सांगून ट्रक घेऊन गांजाच्या शेताची लागवड असलेल्या ठिकाणी नेऊन गांजा भरून घेत. त्यावर शहाळे टाकून परत हैदराबादमार्गे येऊन सोलापूर, पुणे येथे काही गांजा उतरविला जात असे. त्यानंतर सातपुते याच्या मालकीच्या भिवंडीतील गोदामात ट्रक उतरविला जाई, तेथून गांजा विविध ठिकाणी पाठविला जात असे. याप्रकरणी तस्कर आकाश यादव याच्या विरुद्ध सुरत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

गांजा विक्रीचा पैसा हवालामार्फतगांजा विक्रीतून महिन्याला सरासरी सात कोटी रुपये जमा होत होते, ते कधी रोखीने तर कधी हवालामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविले जात होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी