शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 21:15 IST

Khamgaon Crime News : खामगावात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एका मालवाहू वाहनातून अकोलाकडे जात असलेला तब्बल १७ लक्ष रुपयांचा गुटखा शहर पोलिसांनी नाकाबंदी करून शुक्रवारी सायंकाळी पकडला. या कारवाईत आठ लाख रुपयांच्या मालवाहू वाहनासह २५ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरातील गुटखा माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खामगाव शहरातील लंकडगंज भागातून भुसावल चौक मार्गे अकोलाकडे जात असलेल्या  एका वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी गौतम चौक आणि परिसरात नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच १९ झेड ४२७९ या क्रमांकाच्या वाहनातून चालक गणेश रामहार भोई(४०) रा. एसी मोहल्ला वार्ड नंबर ८, शहापूर जि. बºहाणपूर(मध्यप्रदेश) याच्या ताब्यातून मोठ्याप्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये पान मसाल्याचे  १३ लक्ष ६६ हजार  ८०० रुपयांचे ११ हजार ३९० पाकीट आणि ३ लाख ४१ हजार ७०० रुपये किंमतीचा सुंगधित तंबाखू आणि ८ लक्ष रुपये किंमतीचे मालवाहू वाहन असा एकुण  २५ लक्ष ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरिक्षक गौरव सराग, सम्राट ब्राम्हणे, पोहेकॉ अरूण हेलोडे, गजानन बोरसे, नापोकॉ सूरज राठोड, संतोष वाघ, पो.कॉ दीपक राठोड, प्रफुल्ल टेकाडे, जितेश हिवाळे, अमरदिपसिंह ठाकूर, अनंता डुकरे यांनी ही कारवाई केली.

नाकाबंदीनंतर केली कारवाई!- गत काही दिवसांपासून शहरातील गुटखा माफीयांना शहर पोलिसांकडून लक्ष्य केल्या जात आहे. शहरात विविध ठिकाणी गुटखा जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करून शहर पोलिसांनी पुन्हा मोठ्याप्रमाणात गुटखा साठा जप्त केला.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी