शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:36 IST

अपघातामुळे पकडला गेला वाहन चोर

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: चावीच्या दुकानात डुप्लीकेट चावी बनविण्याचा हँड व्हाईस चोरी करून त्याच्यापासून चाव्या बनवत वाहने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या चार चाकी वाहनाच्या अपघातामुळे आरोपी पकडला गेला आहे. पोलिसांनी आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेले लाखो रुपयांचे वाहनेही जप्त करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

न्यू लिंक रोड फायर ब्रिगेड जवळ राहणारे दीपक मदनलाल शाह (४५) यांचा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय आहे. त्यांची दीड लाख रुपये किमतीची कार ३१ ऑगस्टला रात्री नेमिनाथ नगर आचोळे रोड येथे रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली असताना चोरट्यांनी ती चोरी करून नेली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत होणा-या वाहन चोरींचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चोऱ्यांवर आळा घालणेबाबत वरीष्ठांनी ओदशित केले होते. त्या अनुषंगाने घडणा-या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक यांचे मार्फतीने करण्यात येत होते.

आचोळ्यातील चोरीला गेलेल्या व्हॅग्नार कारचे सीसीटीव्ही फुटेज माग काढत असताना ती कार श्रीराम नगर या ठिकाणी अपघातग्रस्त अवस्थेत सापडली. अपघातग्रस्त वाहनाचे चालका बाबत आजूबाजूला तपास केल्यावर आरोपीच्या कपाळास दुखापत झाल्याची माहीती मिळाली. जखमी आरोपी हा उपचाराकरीता अपघाताचे परिसरात जाण्याची शक्यता असल्याने रुग्णालयात तपास करताना त्याने धानिवबागच्या साई हॉस्पिटल येथे दवाउपचार घेतल्याची माहीती मिळाली. गुन्हे शाखेने सापळा रचुन शादाब उर्फ बाबा उर्फ तावडे नौशाद शेख (२३) याला ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केल्यावर सदर गुन्हाचा सहभाग निष्पन्न झाल्याने अटक केली. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर आयुक्तालयातील वाहन चोरीचे ११, घरफोडीचा १, मोबाईल चोरीचा १ इतर चोरीचा १ असे एकुण १४ गुन्हे व मुंबई पोलीस आयुक्तालयातील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपीकडून उघडकीस आणलेल्या १७ गुन्हयात १२ दुचाकी, २ चार चाकी, ४ मोबाईल व १ डुप्लीकेट चावी बनविण्याचा हँड व्हाईस व चाव्यांचा गुच्छा असा ५ लाख ९४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.   अटक आरोपी विरुध्द विनोबा भावे नगर पोलीस ठाणे येथे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत.             

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, म.सु.ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपारा