शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

चितळाची शिकार करणा-या १७ आरोपींना अटक; वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:38 IST

सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत.

गडचिरोली : सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना गडचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी आहेत.वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दोन्ही गावातील नागरिकांनी जाळे लावून जंगलात एका नर चितळाची शिकार केली. त्यानंतर त्याचे मांस शिजवण्यासाठी गावात आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. कैलुके यांच्या नेतृत्वात वनकर्मचा-यांनी गावात जाऊन संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. तसेच शिकारीचे जाळे, लोखंडी भाला, कु-हाड, विळा, लाकडी खुंट्या, चितळाचे कच्चे व शिजवलेले मांस, त्याकरिता वापरलेली भांडी आदी साहित्य जप्त केले. याशिवाय आरोपींनी जंगलातील पश्चिम गुरवळा बिट नंबर १६६ या राखीव वनात शिकार केलेल्या ठिकाणी फेकून दिलेले कच्चे मांस, तोंड, शिंग, पाय जप्त करण्यात आले.या प्रकरणात शिवणी येथील आरोपी मनोहर उष्टुजी भोयर, गजानन लक्ष्मण चुधरी, बाजीराव मसाजी कांबळे, जगन्नाथ मसाजी कांबळे, कार्तिक पुरूषोत्तम गेडाम, संतोष मोरेश्वर मेश्राम, आनंद वामन मानकर, धनराज एकनाथ गेडाम, येमाजी एकनाथ गेडाम, रुषी हना भोयर, अमित राजेंद्र लाटलवार, जीवन दादाजी गेडाम, विनोद गणपत भोयर, योगाजी महादेव गेडाम तसेच हिरापूर येथील आरोपी पुरूषोत्तम तुकाराम भोयर, सुरेश पत्रुजी गेडाम, हिरामण तडकुजी गेडाम अशा १७ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.वन्यजीवाच्या शिकारप्रकरणी एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.आय.यटबॉन, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या पथकाने केली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली