शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक, एक फरार

By नरेश रहिले | Updated: January 29, 2023 14:52 IST

या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. ही कारवाई २८ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

गोंदिया : गोंदिया शहरातील एका १६ वर्षाच्या मुलीवर गोंदियापासून तर नागपूरपर्यंत सतत तीन दिवस सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन नराधमांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. ही कारवाई २८ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.

गोंदिया शहरातील १६ वर्षाच्या एका मुलीला शहराच्या मामा चौकातून २४ जानेवारी रोजी उचलून तिला बांधतलाव येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दोन तासानंतर पुन्हा तिला मामा चौकात सोडण्यात आले. दुसऱ्याने लगेच तिला एमआयडी परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिला पुन्हा मामा चौकात आणल्यावर तिला नागपूरच्या एका व्यक्तीकडे स्वाधीन करण्यात आले. त्याने नागपूर येथे नेऊन तिच्यावर २४ ते २७ जानेवारी या काळात अत्याचर करण्यात आला. तिला २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदियात सोडण्यात आले. 

या प्रकरणात तीन नराधमांवर भादंविच्या कलम ३६३, ३७६, ३७६ (२), (एन), ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्वरीत पाऊले उचलली. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने यानच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होंडे, पोलीस हवालदार अनिल कोरे यांनी आरोपींना अटक केली.

आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीसामूहिक बलात्कार प्रकरणात गोंदिया सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड येथील प्रशांत मुलचंद मोटघरे (२७) व ढाकणी येथील सौरभ ईश्वर मेश्राम (२३) या दोघांना अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी