शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये नर्सिंग कोर्सच्या नावाखाली १५० तरुणींची फसवणूक!

By मुरलीधर भवार | Updated: October 4, 2023 17:30 IST

फसवणूक झालेल्या तरुणींनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली हाेती. त्यांनी या तरुणींना घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली.

कल्याण- इंडियन नर्सिंग कौन्सिलचे प्रमाण पत्र मिळून देतो असे सांगून जवळपास १५० तरुणींकडून १ लाख ७५ हजार रुपये उकळणाऱ्या उड्डाण इन्स्टिट्यूट आ’फ एज्यूकेशनच्या विरोधात फसवणूक झालेल्या तरुणींनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या इन्स्टीट्यूचा चालक वरुण झा याच्या विरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्याची तक्रार तरुणींनी दिली आहे. पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल करुन या प्रकरणात पुढील चौकशी सुरु केली आहे.

फसवणूक झालेल्या तरुणींनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली हाेती. त्यांनी या तरुणींना घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांशी या प्रकरणी चर्चा केली. फसवणूक करणाऱ्याच्या विरेाधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या संस्थेचे कार्यालय झुंझारराव संकुलात आहे. या संस्थेने कोर्सच्या नावाखाली प्रत्येक तरुणीकडून १ लाख ७५ हजार रुपये फी घेतली आहे. हा कोर्स ३ वर्षाचा होता. त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर इंडियन नर्सिंग कौन्सीलचा उल्लेखच नाही. 

तसेच त्यावर विश्मकर्मा विद्यापीठाचा उल्लेख करण्यात आला आहे. तशा नावाचे विद्यापीठच अस्तित्वात नसल्याचे रिद्धी इंदूलकर या तरुणीने सांगितले. राबिया इंद्रीय या तरुणीने सांगितले की, आम्हाला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर अ’डव्हान्स डिप्लोमा पेशंट केअर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर इंडियन नर्सिंग कौन्सीलचा उल्लेखच नाही. आमच्याकडून फी वसूल करुन आमची फसवणूक केली आहे. दिलेल्या प्रमाणपत्रावर जो बार कोड दिला आहे. तो स्क’न केला तर त्याठिकाणी हा’लीवूडच्या हिरो हिरोईनचे फोटो आेपन होता.

या तरुणींनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. हा तक्रार अर्ज पोलिसांनी दाखल करुन घेतला आहे. पोलिस या तक्रार अर्जाच्या आधारे चौकशी करणार आहेत. या प्रकणातील काही तरुणांची कोर्स पूर्ण झाला आहे तर काही तरुणांचा कोर्सचा कालावधी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आणखीन तरुणांची आर्थिक फसवणूक होऊ शकतो. तक्रारदार तरुणींनी सांगितले की, त्यांचे तीन वर्षात घेतलेले शिक्षण त्यांचे फसवणूक झाल्याने वाया गेले आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न या शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूकीतून झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण