शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चलनातून बाद झालेल्या १५ लाखांच्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 14:52 IST

अकोला : केंद्र शासनाने चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा स्थानिक गुन्हे शाखेने न्यू राधाकिसन प्लॉट येथील रेड डोअर कॅफेमध्ये बसून असलेल्या दोघांकडून शनिवारी रात्री उशिरा जप्त केल्या.

ठळक मुद्देप्रकाश मोरे व सूरज सोनवणे या दोघांच्या हालचालीवरून त्यांच्याकडे नोटा असल्याचा कयास पोलिसांनी लावला. ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.स्पेसिफिक बँक नोटा अ‍ॅक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : केंद्र शासनाने चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा स्थानिक गुन्हे शाखेने न्यू राधाकिसन प्लॉट येथील रेड डोअर कॅफेमध्ये बसून असलेल्या दोघांकडून शनिवारी रात्री उशिरा जप्त केल्या. पुणे जिल्ह्यातील दोंड व खामगाव येथील बाळापूर फैलमधील रहिवासी अशा एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील दोंड येथील रहिवासी सूरज सुनील सोनवणे (२५) व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाळापूर फैलातील रहिवासी प्रकाश नथ्थुजी मोरे (३५) हे दोघे चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन न्यू राधाकिसन प्लॉट येथील एका कॅफेत बसलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह धाव घेऊन या कॅफेतील संशयितांची तपासणी सुरू केली असता प्रकाश मोरे व सूरज सोनवणे या दोघांच्या हालचालीवरून त्यांच्याकडे नोटा असल्याचा कयास पोलिसांनी लावला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर दोन्ही आरोपींनी चलनातून बाद झालेल्या नोटा बॅगेत असल्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १४६ नोटा म्हणजेच एक लाख ४६ हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या २ हजार ७०८ नोटा म्हणजेच १३ लाख ५४ हजार रुपये अशा एकूण १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. दोन्ही आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्पेसिफिक बँक नोटा अ‍ॅक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, रणजितसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, भावलाल हेंबाडे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी