शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आयकर’चे बनावट ज्वॉइनिंग लेटर देत १४.५० लाखांना गंडा!

By प्रदीप भाकरे | Updated: June 22, 2024 15:40 IST

महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवालीत गुन्हा

अमरावती: आयकर विभागाचे बनावट ज्वाईनिंग लेटर देऊन एका महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. १ सप्टेंबर २०१९ ते २ मे २०२२ रोजी दरम्यान ती घटना घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी २१ जून रोजी दुपारी एक महिला, संदीप बाजड, नसुरल्ला शहा (दोघेही रा. अमरावती), कामील, मोहसीन, निरज पांडा (रा. दिल्ली), कदम (रा. खाररोड, मुंबई) व कल्याण रेल्वे जंक्शनवरील एका बिडीओविरूध्द फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             खापर्डे बगिचा येथील महिलेच्या तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन त्यांच्या बेरोजगार मुलाला नोकरी लावुन देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी त्या महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. ती रक्कम १४ लाख ५० हजारांपर्यंत पोहोचली. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाला आरोपींनी आयकर विभागाचे बनावट जॉईनिंग ऑर्डर दिली. मात्र आयकर विभागात जाऊन माहिती घेतली असता ती ऑर्डर बनावट व खोटी असल्याचे उघड झाले. 

त्यामुळे महिलेला फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी आरोपींना त्याबाबत जाब विचारला. त्यानंतर दोन वर्ष आरोपींनी ती १४.५० लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन वर्ष उलटल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने महिलेने अखेर पोलीस उपायुक्तांकडे धाव घेतली. सिटी कोतवाली पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या ११ मे रोजीच्या परवानगीनंतर यात २१ जून रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी