शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४०० कोटींचा घोटाळा; क्वॉलिटी आइस्क्रीमवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:05 IST

बँकांनी केली तक्रार दाखल : सीबीआयचे धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आइस्क्रीम बनविणाऱ्या क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर १४०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी दिल्ली, बुलंदशहर, सहारनपूर, अजमेर, पालवाल या ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी घातल्या.

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका गटाने तक्रार दाखल केली होती. क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक संजय धिंग्रा, सिद्धांत गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांचे तसेच आणखी काही लोकांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.बँकेचा पैसा अन्यत्र वळविणे, बनावट कागदपत्रे, पावत्या तयार करणे, खोट्या मालमत्ता दाखविणे असे अनेक गैरव्यवहार क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीकडून झाल्याचे बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील काही बँकांच्या गटांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. बँक आॅफ इंडियाशिवाय या बँकांच्या गटात कॅनरा बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे.

क्वालिटी कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याचा जो आरोप आहे, त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने देशभरात काही ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये नेमके कोणते पुरावे सापडले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.साथीदारांचीही होणार चौकशीक्वॉलिटी कंपनीच्या संचालकांनी जो गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे, त्या कृत्यांमध्ये त्यांना आणखी कोणी कोणी साथ दिली त्याचीही चौकशी सीबीआय करणार आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत क्वॉलिटी कंपनीने आपली भूमिका अद्याप प्रसारमाध्यमांकडे मांडलेली नाही.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी