शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतील मुलीवर अत्याचार, नंतर गर्भपात; पीडितेच्या आई-वडिलांनाही दिल्या धमक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:36 IST

पीडित मुलीचे आई-वडील दिव्यांग आहेत. गावातीलच तरुण त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका ढाब्यावर जेवण, दारू पिण्यासाठी येत होता

बीड - दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच दारुड्या तरुणाने अत्याचार केला. नंतर त्याच्या भावासह मित्राने पीडितेच्या आई-वडिलांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर गाठले. त्यानंतर शहराजवळीलच एका डोंगरात नेऊन तिचा गर्भपात केला. हा प्रकार २४ जून रोजी घडला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी पीडितेच्या आई-वडिलांना धमक्या देत गावातून बाहेर काढले. या सर्व प्रकरणाची शनिवारी बीड ग्रामीण ठाण्यात नोंद झाली असून तब्बल १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पीडित मुलीचे आई-वडील दिव्यांग आहेत. गावातीलच तरुण त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका ढाब्यावर जेवण, दारू पिण्यासाठी येत होता. एके दिवशी घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने तिच्याशी लगट केली. तसेच, दोन ते तीन दिवसाला तिला बोलावून घेत रात्रीच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेतातच वारंवार अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. मुलीच्या पाेटात दुखायला लागल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर सोनोग्राफी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

धमकी देऊन पुण्याला पाठविले त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीच्या मित्राला कॉल केला. त्याने हे प्रकरण वाढवायचे नाही, असे म्हणत पीडितेसह तिच्या आई-वडिलांना सोबत घेऊन एका कारमधून छत्रपती संभाजीनगर गाठले. शहराजवळील एका डोंगरातील पत्र्याच्या शेडमध्ये पीडिता व तिच्या आईला नेले. तेथे अगोदरच दोन ते तीन जण थांबलेले होते. त्यांनी पीडितेला गोळ्या दिल्या. त्यामुळे तिला रात्रभर कळा आल्या आणि सकाळी तिची प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला; परंतु हे बाळ मयत होते, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पुन्हा पीडितेसह आईला छत्रपती संभाजीनगर शहराजवळच आणून सोडले. त्यानंतर पीडितेसह तिच्या आई-वडिलांना धमकी देत पुण्याला पाठवून दिले. तेथे १५ दिवस राहिल्यानंतर पीडितेच्या चुलत भावाने तक्रार केल्याने हा प्रकार उघड झाला.