शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उरण येथील जीडीएल कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या १०० अधिकाऱ्यांची  धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 22:18 IST

उरण तालुक्यातील  नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीतुन कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते.

- मधुकर ठाकूर

उरण : येथील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (२४) धाड टाकली आहे.सुमारे १०० अधिकारी, कर्मचारीसुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून कागदपत्रं व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसुन तपासणी करीत आहेत.

 उरण तालुक्यातील  नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीतुन कंटेनर मालाची मोठ्या प्रमाणावर आयात -निर्यात केली जाते.या कंटेनर यार्डमधून सोने, अमली पदार्थ, रक्तचंदन आणि इतर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे हे कंटेनर यार्ड याआधीच डीआरआय, न्हावा- शेवा सीमा शुल्क, पोलिस यंत्रणेच्या रडारवर आहे.तस्करीच्या घटनांमुळे याआधीच सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपनीवर गुरुवारी सकाळी सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजता गुप्तपणे टाकण्यात आलेल्या धाडीत  सुरक्षा यंत्रणांसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारीसहभागी झाले आहेत.

तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी कंपनीचे गेट बंद केले आहे.कर्मचारी, अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आतमधील कारवाईची खबरबात लागणे अशक्य होऊन बसले आहे. छाप्याची खबर मिळताच उरण पोलिसांनी इन्कमटॅक्स विभागाचे अधिकारी आणि कंपनीकडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कारवाई गुप्त असल्याचे सांगत माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. या कारवाई प्रकरणात इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही अधिक माहिती मिळते काय याची प्रतीक्षा लागुन राहिली असल्याचे न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स