शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

२६ परदेशींच्या पोटात १०० कोटींचे ड्रग्ज, रुग्णालयात नेऊन केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 08:30 IST

पाच वर्षांत अब्जावधींचा साठा जप्त

संतोष आंधळे

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमचे अधिकारी एखाद्या व्यक्तीला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक किंवा संशयित म्हणून ताब्यात घेतात. त्या व्यक्तीने जर अमली पदार्थ कॅप्सूलच्या साह्याने गिळून टाकले असतील किंवा शरीराच्या  अन्य भागात लपविले असतील तर त्याचा शोध घेण्यासाठी  त्या आरोपीना शासनाच्या जे. जे. रुग्णालयात नेले जाते. गेल्या पाच वर्षांत २६ आफ्रिकन नागरिकांना या रुग्णालयत आणले असून, त्यांच्याकडून  कोकेन आणि हेरॉइन्सच्या २१०० कॅप्सूल काढण्यात आल्या आहेत. त्याची किंमत बाजारात १०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जे. जे. रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक विभागाचे डॉक्टर वैद्यकीयदृष्ट्या संशोधन करून लवकरच यासंदर्भात शोधनिबंध सादर करणार आहेत.  अमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक परदेशी नागरिक विविध क्लृप्त्या करतात. त्यातलीच एक युक्ती म्हणजे शरीरात कॅप्सूल लपविणे. काही महाभाग तर चक्क अमली पदार्थाच्या कॅप्सूल तयार करून त्या गिळतात. त्या पोटात सुरक्षित राहतात. काही प्रकरणांत तर महिलांनी निरोधचा वापर करत अमली पदार्थांच्या कॅप्सूल योनीमार्गात ठेवल्याचे प्रकारही आढळून आले आहेत. काहीवेळा या कॅप्सूल पार्श्वभागातही ठेवल्या जातात. 

असा काढला जातो ऐवजnकस्टमचे अधिकारी विमानतळावर पकडलेल्या तस्कराला जे. जे. रुग्णालयात आणतात. nजे. जे. रुग्णालयात त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. nतस्कराचे प्रथमत: एक्स-रे आणि सीटी स्कॅन केले जाते. त्यात कॅप्सूल कुठे लपविल्या आहेत, हे स्पष्ट होते. nआरोपीने गोळ्या गिळल्या असतील तर त्याला पचनसंस्थेशी निगडित औषधे देऊन नैसर्गिक विधीद्वारे त्या कॅप्सूल्स काढल्या जातात.nत्यानंतर पुन्हा सीटी स्कॅन आणि एक्स-रे केले जाते. तस्करी करून आणलेल्या कॅप्सूल्सचा पंचनामा करून त्या कस्टम अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या जातात.  

वैद्यकीय भाषेत बॉडी पॅकर्सआमच्या रुग्णालयात अशा पद्धतीचे रुग्ण येत असतात. या व्यक्तींना वैद्यकीय भाषेत ‘बॉडी पॅकर्स’ असे म्हणतात. गेल्या पाच वर्षांत २६ बॉडी पॅकर्स आमच्याकडे आले असून, त्यापैकी ४ महिला होत्या, बाकी पुरुष होते. ते बहुतांश कॅप्सूल्स गिळून पोटात ठेवतात वा गुदद्वारात ठेवतात. तर महिला या योनीमार्गात या कॅप्सूल्स ठेवतात. स्त्रीरोगतज्ज्ञ त्याची तपासणी करून अमली पदार्थ त्यांच्याकडून हस्तगत करतात. बाकी बहुसंख्य प्रकरणे पोटातून तस्करी करत असल्याचीच आढळून आली आहेत. या सर्व प्रकरणांचा अभ्यास आम्ही करत असून, याच्यावर लवकरच शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे.- डॉ. अजय भंडारवार, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख, जे. जे. रुग्णालय.

एक कॅप्सूल अडकली अन्...काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या एका आरोपीच्या पोटातून एक गोळी नैसर्गिक विधीतून न निघाल्यामुळे ती पोटाच्या आतड्यामध्ये अडकून बसली होती. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे ती गोळी पोटातून काढण्यात आली. ही अशी पहिलीच वेळ होती. या आरोपीकडून तब्बल ११६ कॅप्सूल्स काढण्यात आल्या. - डॉ. अमोल वाघ, शल्य चिकित्सक, जे. जे. रुग्णालय. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSouth Africaद. आफ्रिका