शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्याला १० वर्षे कारावास : नागपूर जिल्ह्यातील केळवदमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 21:54 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना केळवद पोलिसांच्या हद्दीतील आहे.रोशन खेमराज मोहतकर (२२) असे आरोपीचे नाव असून तो तिडंगी, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी सात वर्षे वयाची होती. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. १४ डिसेंबर २०१२ रोजी आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले व तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी एफआयआर नोंदवला व आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Rapeबलात्कारDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय