शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 17:29 IST

सेलिब्रिटी असून पोलीसांनी वरुण धवनचा कान धरला पण बाकी रोड रोमिओंचं काय?

ठळक मुद्देगाडी चालवताना स्टण्ट करण्याला हिरोगिरी नाही तर माकडचाळेच म्हणतात, हे तरुणांना कधी कळणार?

मुंबई पोलीसांनी वरुण धवनचा कान धरत त्याला चांगला दम भरला याची बातमी आज व्हायरल आहे. पोलीसांचं व्टिट आणि वरुणचा एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेला फोटोही इंटरनेटवर चकरा मारतोय. वरुण धवनने भररस्त्यात गाडीतून बाहेर डोकावत एका फॅन मुलीबरोबर सेल्फी काढला. तो फोटो प्रसिद्धही झाला. फॅनला वरुणने नाराज केलं नाही यासाठी त्याचं कौतूक असलं तरी पोलीसांनी मात्र त्याला ट्राफिक नियम व्टिट करुन सांगितले आणि बजावलं की अशी ¨हरोगिरी फक्त सिनेमात कर, प्रत्यक्षात नको. बाकी तुला इ चालान पाठवतोय ते भर. पुन्हा असं केलंस तर कठोर कारवाई करु! वरुणला तर पोलीसांचा मेसेज कळला असेल पण रस्त्यावरच्या तरुण हौशी बायकर्सचं आणि गाडय़ा चालवणार्‍याचं काय? ते करतातच अशी रोडगिरी.त्यातले काही नमूने तर आपल्या अवतीभोवतीही दिसतात.

त्यातलेच हे काही स्टण्टमॅन.1) अनेकजण बाइक चालवतानाच मान वाकडी करकरुन फोनवर बोलतात. 2) धूम स्टाईल ट्रिपल सीट गाडय़ा चालवतात. सुसाट.3) अनेकांच्या गाडय़ांचे हॉर्न इतके कर्कश असतात की बाकी पब्लिक दचकतंच.4) बाइक चालवताना उभं राहणं, ओरडणं सर्रास चालतं.5) टू व्हीलर रस्त्यात, टर्नवरच उभं राहून टोळकी गप्पा मारतात ते वेगळंच.6) टू व्हीलर ठीकच पण कार चालवतानाही बोलणं सर्रास असतात.7) काहीजण गाडी रस्त्यातच उभी करुन बोलत बसतात.8) डबल पार्कीग नावाचा आजार तर सर्वत्र दिसतो.9) गाडीच्या काचेतून, छतातून डोकं बाहेर काढून उभं राहून स्टण्ट करणारे हिरो तर शहरागणिक दिसतात.10) चालत्या गाडीतून सेल्फी काढणारे बहाद्दरही कमी नाही.11) यासार्‍यांना वाहतुकीचे नियम कोण समजावणार? सिगAलवर न उभं राहणं या आजारातून मुक्त होण्याची तर काही शक्यताच दिसू नये इतकी परिस्थिती भिषण आहे. असं का होतं याचा विचार तरुणांनी करायला हवा. पोलीस ते करतील आणि कारवाईचा बडगा उगारतील तेव्हाच आपण सुधारू याला काही अर्थ नाही.