नाशिक : राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीमंगळवारी (दि़ ६) काळ्या फिती लावून काम करणार आहेत़ जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर विकास आघाडीच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़ यामध्ये शिक्षणविषयक अनिश्चित धोरण, शिक्षण कायद्याची सापेक्ष अंमलबजावणी, संदिग्ध परिपत्रके, कामातील शिथिलता याबाबत शिक्षकांमध्ये असंतोष आहे़ याबाबत संघटना आंदोलन करणार असून, शासनास सावध करण्याच्या हेतूने उद्या काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवत शिक्षक काम करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी सांगितले़
काळ्या फिती लावून आज शिक्षकांचे कामकाज
By admin | Updated: January 6, 2015 00:47 IST