वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी याकरिता एकूण १७ प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली. चार प्रकरणे अपात्र तर दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना तातडीची मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.सेलू तालुक्यात घोराड येथील मृतक महादेव गेंदालाल वरटकर, आकोली येथील मंगेश आंबटकर, वडगाव येथील लक्ष्मण कुमरे, तळोदी येथील लक्ष्मण बावणे, जुवाडी येथील सिद्धार्थ धवने, देवळी तालुक्यातील तांबा येथील संदेश रामदास वाघाडे, लोणी येथील मधुकर धारकर, कवठा (रेल्वे) येथील पुरणदास गायकवाड, आंजी (ब.) येथील प्रफुल्ल भोयर, टाकळी येथील पंढरी ठाकरे, बोरगाव (आ.) येथील विश्वनाथ टिपले या मृतकांच्या वारसदारांना तातडीची मदत देण्यात समितीने पात्र ठरविले आहे. देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील किसना डडमल आणि गौळ येथील अतुल भोयर या मृतकांची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. अपात्र प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील शांताबाई ठाकरे, किन्हाळा येथील रघुनाथ पडधाम, आष्टी तालुक्यातील काकडदरा येथील सुरेश गुळभेले आणि देवळी तालुक्यातील कोल्हापूर (सि.) येथील मंगेश ठवळे या मृतकांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, असेही अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंब पात्र
By admin | Updated: September 15, 2014 00:19 IST