अनोख्या स्पिड बॉक्सने सायकल धावणार कमी वेळात जास्त अंतर रियाज खानचे संशोधन : वृद्धांसाठी ठरणार वरदान
By admin | Updated: January 22, 2016 00:09 IST
जळगाव : भारत नगरात राहणारे रियाज खान यांच्या नवनविन शोध घेण्याच्या संशोधक वृत्तीमुळे आणि वेगळे काहीतरी करून दाखविण्याच्या ध्यासामुळे त्यांनी एक अनोखा सायकल स्पिड बॉक्स तयार केला आहे.
अनोख्या स्पिड बॉक्सने सायकल धावणार कमी वेळात जास्त अंतर रियाज खानचे संशोधन : वृद्धांसाठी ठरणार वरदान
जळगाव : भारत नगरात राहणारे रियाज खान यांच्या नवनविन शोध घेण्याच्या संशोधक वृत्तीमुळे आणि वेगळे काहीतरी करून दाखविण्याच्या ध्यासामुळे त्यांनी एक अनोखा सायकल स्पिड बॉक्स तयार केला आहे. हा स्पिड बॉक्स सायकलीला लावला असता कमी पॅडल मारून सायकल जास्त वेगात धावणार असून मेहनतदेखील कमी लागणार आहे, या स्पिडबॉक्समुळे वेळ व श्रमाची बचत होऊन जास्त अंतर कापणार आहे. त्यामुळे वृद्धांसाठी ही सायकल एक वरदान ठरणार आहे. हा आहे फरक स्पिड बॉक्स मध्ये गेअर बसविले असून साध्या सायकलीत पॅडेल जवळील चक्री मोठी आणि मागील चाकाजवळची चक्री लहान असते, तर स्पिड बॉक्स बसविलेल्या सायकलीत मागील चाकाजवळील चक्री पॅडेल जवळील चक्रीपेक्षा मोठी असल्याने सायकल कमी पॅडेल मारल्याने अधिक धाव घेते. रियाज खान हे अल्प शिक्षित असून ॲंग्लो उर्दु हायस्कूलमध्ये वीस वर्षापासून शिपाई पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून त्यांनी संशोधन करण्याची वृत्ती जोपासत स्पिड बॉक्सवर मागील पंधरा वर्षापासून काम करीत आहेत. त्यांच्या या अथक व निरंतर प्रयत्नांना यश आले असून स्पिड बॉक्स निर्माण झाला आहे.