शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पुणे विद्यापीठ देणार महाविद्यालयांना तंबी?

By admin | Updated: July 7, 2016 00:57 IST

आंदोलनामुळे त्रस्त : विद्यार्थ्यांनाही लावणारा चाप

आंदोलनामुळे त्रस्त : विद्यार्थ्यांनाही लावणारा चापनाशिक : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी भांडणार्‍या विद्यार्थी संघटना सनदशीर मार्गाचा अवलंब न करता आक्रमक भूमिका घेत असल्याच्या अनुभवामुळे पुणे विद्यापीठाने चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन करताना विद्यार्थी संघटना अधिकार्‍यांना अवमानकारक भाषेचा वापर करीत असल्याचा अनुभव आल्याने विद्यापीठाने आता विद्यार्थी संघटनांकडे जाऊ नये यासाठी संबंधित महाविद्यालयांनाच तंबी देणार असल्याचे समजते. सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या, ४६ शैक्षणिक विभाग आणि ४७४ महाविद्यालये असा मोठा कारभार पुणे विद्यापीठामार्फत चालतो. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्‘ातील महाविद्यालये आणि विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. इतका मोठा विस्तार असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे अनेकदा प्रश्न निर्माण होतात. विद्यापीठाच्या अधिकृत मंडळांवर याविषयीदेखील चर्चा होते. कित्येकदा विद्यार्थी संघटना विद्यापीठाकडून झालेल्या चुका निदर्शनास आणून देतात. त्यातून कित्येकदा मार्ग निघतो, काही प्रश्नांना विलंबदेखील लागतो. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी विद्यार्थी संघटनांची भूमिका असते. त्यामुळे विद्यार्थी संघटना आंदोलनाचा मार्ग अवलंबितात. मात्र अशा प्रकारचे आंदोलन करताना विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्यापीठाचे किंवा उपकेंद्रांचे अधिकारी वेठीस धरले जातात. विद्यार्थी संघटनांचे काही अतिउत्साही कार्यकर्ते संबंधित अधिकारी आणि व्यवस्थेविषयी अवमानकारक विधाने करीत असल्याची बाब विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी कथन केल्यामुळे सदर आंदोलने विद्यापीठापर्यंत येऊच नये यासाठी विचारविनिमय केला जात आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही प्रश्न असले तरी ते महाविद्यालयीन पातळीवरच सोडविले जावेत, महाविद्यालयाने विद्यापीठ आणि संबंधित विद्यार्थ्यांचा समन्वय साधून कार्य करावे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे प्राथमिक काम महाविद्यालयीन पातळीवरच व्हावे यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांना सुचना देणार असल्याचे समजते. विद्यार्थी संघटनांकडे जाणारच नाहीत याची खबरदारी घ्यावी अन्यथा विद्यापीठालाच याबाबत जबाबदार धरण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. सध्या अभियांत्रिकीचा मुद्दा ज्वलंत असल्यामुळे तूर्तास लागलीच याविषयी चर्चा होणार नसली तरी येत्या काही दिवसांत याबाबतचे धोरण निश्चित करून विद्यार्थ्यांचे प्रश्न महाविद्यालयीन पातळीवरच सोडविण्याबाबत तोडगा काढला जाणार आहे. तशी यंत्रणा पुणे विद्यापीठात कार्यान्वित करण्याचादेखील विचार असून, संबंधित शाखा केवळ निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच लक्ष केंद्रित करणार आहेत. --जोड देत आहे---