ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होतेआंगनवाडी सेविका, मदतनिस , आशा कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या पालेभाज्या , विविध प्रकारची कडधन्ये , विविध प्रकारचे शरीरास पोषक असे तयार खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शन भरवले होते त्यांचे उद्घाटन उपसरपंच आककबाई खरे , यू . बी. निकम ,तसेच माधुरी अहिरे यांचे हस्ते करण्यात आले .पोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक , ग्रामपंचयत सदस्य , ग्रामस्थ े सहभागी झाले होते. जन जागृती फेरी नंतर विशेष ग्राम सभा सम्पन्न झाली . ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल यानी पोषण आहार अभियानाची माहिती देत प्रत्येक कुटुंबत गरोदर महिलांची काळजी , प्रसूति नंतर बालकाला तत्काल व सहा महिन्या पर्यंत निव्वळ स्तनपान , वयाच्या सहा महीने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार , बालक महिला व मूली मधील रक्ताची अल्पता , , मुलींचे शिक्षण , पोषण आहार व विवाह योग्य वय , वैयिक्तक स्वछता व परिसर स्वच्छता , आरोग्यदायी व सूक्षम पोषण मूल्य असलेल्या आहराचे सेवन या विषयावर मार्गदर्शन केले.
कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:21 IST
ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होते
कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शन
ठळक मुद्देपोषण आहार बद्दल जन जागृति साठी विविध पालेभाज्या व फलानी सजवलेला रथ, तसेच घोष वाक्य लिहिलेली फलक हातात घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.