शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

पॉलिटेक्निक दीक्षांत समारंभ

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्या

तरुणांनो, राष्ट्रविकासाला प्राधान्य द्या
संजय चहांदे : शासकीय तंत्रनिकेतनचा दीक्षांत समारंभ थाटात
(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : देशाचा विकास करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ शासनावर विसंबून न राहता प्रत्येकाने आपापल्या परीने त्याकरिता प्रयत्नरत असायला हवे. विशेषत: जागतिकीकरणाच्या या युगात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काम करीत असले तरी तरुणांनी राष्ट्रविकासाचा नेहमीच विचार करायला हवा, असे मत राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांनी केले. स्थापनेची शंभर वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १७ वा दीक्षांत सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशाला महासत्ता करण्यासाठी तांत्रिक संशोधनावर भर देण्याची गरज आहे. तांत्रिक शोध थांबला तर देशाच्या विकासाची गती थांबेल. तंत्रज्ञानात प्रगती करण्याची फार मोठी जबाबदारी ही शासकीय तंत्रनिकेतनची आहे, असे चहांदे म्हणाले.
गुलाबराव ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षणाला दर्जेदार करण्यासंबंधीच्या मुद्यांवर भर दिला. डॉक्टर व इंजिनीअर हे देशाचे आधारस्तंभ आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण पद्धतीत गुणात्मक बदल करणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या कार्याकडे जोमाने लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य डॉ. थोरात यांनी शैक्षणिक अहवाल वाचनातून शंभर वर्षांच्या उज्ज्वल यशाची माहिती दिली. संचालन दिशा खंडारे यांनी केले तर प्रा. आर.ई. गजभिये यांनी आभार मानले.
७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान
१७ व्या दीक्षांत समांरभात ७०६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. यंदा स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील वैभव राजेश्वर घुशे या विद्यार्थ्याने सर्वाधिक सहा सुवर्णपदके पटकावली. हिमांशू संजय करडभाजणे (अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी), कृतिका उमाजी पांडे (वस्त्रनिर्माण तंत्रज्ञान), दीपक केशवराव सोनवणे (स्वयंचल अभियांत्रिकी) यांचा प्रत्येकी तीन सुवर्णपदके देऊन सत्कार करण्यात आला.