शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

व्यापक पातळीवर मराठीचा विकास, संवर्धन व्हावे (भाग १)

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

- मराठी भाषा विभागातर्फे चर्चासत्र : भाषा तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करणार

- मराठी भाषा विभागातर्फे चर्चासत्र : भाषा तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार करणार
नागपूर : राज्याचे मराठी भाषाविषयक धोरण कसे असावे, याचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीच्या वतीने डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला. हे धोरण अमलात येण्यापूर्वी ते सर्वसमावेशक असावे आणि मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात यावे म्हणून समितीने तयार केलेल्या मसुद्यातील उणिवा आणि सूचनांवर भाषा समिती काम करते आहे. या शृंखलेत बुधवारी समितीने डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या उपस्थितीत भाषातज्ज्ञांशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मान्यवरांनी विविध उपयोगी सूचनांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्यापक पातळीवर मराठीचा विकास होण्यासाठी काही सूचना केल्या.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व भाषा संचालनालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्नातकोत्तर मराठी विभाग व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले होते. मराठी भाषा संवर्धन आणि सुधारणा यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे आवश्यक असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. मराठी विद्यापीठाची स्थापना झाल्यास विविध ज्ञानशाखा मराठीत आणणे शक्य होईल आणि त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होईल. मराठी ज्ञानभाषा झाली तर त्यात रोजगारांचीही निर्मिती होऊ शकेल. उपयोजित मराठी उपयोगात आणण्यासाठी काही उपाययोजनाही यावेळी मान्यवरांनी सांगितल्या. मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने विचारपूर्वक पाऊल उचलल्याशिवाय मराठी शाळांची दुरवस्था सुधारणार नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले. वेगवेगळ्या भाषेतील लोक लिहिते झाले पाहिजे, याप्रकारेच मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यास हातभार लागेल, अशी विविध अंगाने चर्चा यावेळी झाली.
राज्याचे मराठी भाषाविषयक धोरण निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि ८६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती तयार करण्यात आली. या समितीतर्फे भाषा धोरणाचा मसुदा शासनाकडे सादर केला जाणार आहे. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स. जोग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, प्रा.डॉ. प्रमोद मुनघाटे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य यांच्यासह शहरातील भाषातज्ज्ञ, संशोधक व अभ्यासक उपस्थित होते.