भूमितीच्या पेपरला चौघांवर कारवाई
By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST
जळगाव : दहावीच्या परीक्षेत भूमितीच्या पेपरला कॉपी करणार्या चार जणांवर भरारी पथकांनी कारवाई केली त्यात भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन- दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
भूमितीच्या पेपरला चौघांवर कारवाई
जळगाव : दहावीच्या परीक्षेत भूमितीच्या पेपरला कॉपी करणार्या चार जणांवर भरारी पथकांनी कारवाई केली त्यात भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन- दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.कारवाई करण्यात आलेल्या केंद्रात भुसावळच्या बी. झेड. उर्दू शाळेतील एकावर राज्य परीक्षा मंडळ सदस्या शुभांगी राठी यांच्या पथकाने. वरणगांव फॅक्टरीच्या एकावर उपशिक्षणाधिकारी एस. टी. वराडे यांच्या पथकाने तर दहिवद ता. चाळीसगाव केंद्रावर शिक्षणाधिकरी (निरंतर) लता बागुल यांच्या पथकाने दोन जणांवर अशा चार जणांवर कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इन्फो-भूमितीच्या पेपरला विद्यार्थ्यांचा कसभूमितीच्या पेपरला काही प्रश्न कठीण असल्याने तो सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागला. प्रश्न दोन, चार आणि पाच सोडविण्यासाठी विद्यार्थ्याची चांगलीच दमछाक झाली.४० गुणांच्या या परीक्षेत २६ गुणांच्या या तीन प्रश्नांमुळे बहुतांश विद्यार्थ्यांची दमछाक झाल्याचे विद्यार्थर्यांनी सांगितले. दरम्यान परीक्षा केंद्रांवर कापी पुरविणार्यांची गर्दी दिसून आली.