शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी पार्लरमध्ये जाताय?- सांभाळा, इन्फेक्शन होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 15:24 IST

ब्युटी पार्लरमध्ये हल्ली मुली सर्रास जातात, पण सौंदर्य सोडाच, आजारपण सोबत येतंय का हे तपासा. अमेरिकन सिंगर पॉला अब्दुलला पार्लरमध्ये इन्फेक्शन

ठळक मुद्देब्युटीपार्लरची स्वच्छता आणि उत्तम उत्पादनं यांची खात्री करुन घ्या, नाहीतर इन्फेक्शन व्हायचं!

नेहा चढ्ढा

ब्युटी पार्लरमध्ये आपण कशासाठी जातो तर सुंदर दिसावं म्हणून. पण समजा, सुंदर दिसण्याऐवजी काही इन्फेक्शन झालं तर? होऊ शकतंच. अलिकडेच अमेरिकन सिंगर पॉला अब्दुल हिच्या अंगठय़ाला मोठं इन्फेक्शन झाल्याची आणि तो ठणकत असल्याची बातमी जगभर पसरली. पॉला लॉँज एंजेलिसच्या एका नेल सलोनमध्ये नेल आर्ट करुन घ्यायला गेली होती. ते राहिलं बाजूलाच, सोबत हे अंगठय़ाचं इन्फेक्शन मात्र आलं. हे जर अमेरिकेत होऊ शकतं तर आपल्याकडचे पार्लर आठवा, तिथली स्वच्छता पहा, नाहीतर असं इन्फेक्शन आपल्याही वाटय़ाला येऊच शकतं.ब्युटीपार्लर गल्लीबोळात दिसतात, पण त्याचं काही स्टॅण्डर्ड, आरोग्याचे नियम असं काहीही आपल्याकडे नाही.त्यात स्वच्छतेचाही आनंद. वॅक्स करताना घाणेरडय़ा त्याच त्या स्ट्रीप्स पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. काह ठिकाणी तर फेशियल करताना जे फडके चेहरा पुसायला वापरतात ते अस्वच्छ असतं. एकाच पाण्यात पुन्हा पुन्हा ते कापड बुचकळलं जातं. पार्लरमध्ये घालायला म्हणून जे गाऊन देतात ते ही अनेकदा अस्वच्छ असतात. धुतलेले नसतात. आणि हे सारं आपण पैसे मोजून जर करुन घेत असू तर सोबत आजारपण आलं तर काय भावात पडेल?पण असं होतं अस्वच्छ पाणी, घाणेरडे फडके, अनेक लोकांनी वारंवार वापरलेले कपडे यातून आपल्याला अनेक साथीचे आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर हिपेटायटिस बी आणि सी चंही इन्फेक्शन होऊ शकतं.त्यामुळे आपणच सावध राहून योग्य पार्लरची निवड केली पाहिजे.पार्लरमध्ये जाताना.1) पार्लर किती स्वच्छ आहे हे पहा.2) घाणेरडे, दुसर्‍यानं वापरलेले टॉवेल वापरणार नाही हे स्पष्ट सांगा. कुठला वापरणार तो दाखवण्याची मागणी करा.3) वॅक्स, फेशियलसाठी जी भांडी वापरणार, जे कापड वापरणार ते स्वच्छ आहे की नाही बघा.4) शक्यतो त्वचेला इजा होईल असं काही पार्लरमध्ये करू नका.