गांधी विचार भाग २
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
मिळतेय संयमाची शक्तीमहात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या ...
गांधी विचार भाग २
मिळतेय संयमाची शक्तीमहात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घेतली. -सरिता देवलप्रामाणिकपणे काम करण्यावर भरप्रामाणिकपणा हा महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. गांधी आणि त्यांचे विचार जाणून घेत असताना प्रामाणिकपणे समोर असलेले काम पूर्ण करण्याची ऊर्जा मिळाली आहे. नेमून दिलेले काम पूर्ण करण्यावरच भर असतो. पुण्यतिथीनिमित्त एक दिवस श्रद्धांजली वाहण्यापेक्षा रोज त्यांचे विचार कृतीत आणणे जास्त योग्य ठरेल असे मी मानतो.-मनीष चव्हाणवंचितांची सेवा हीच ईश्वरसेवामहात्मा गांधी समजून घेत असताना समाजाप्रति आपले काही कर्तव्य आहे ही भावना निर्माण झाली. युवापिढीमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी माझे प्रयत्न असतात. शिवाय समाजातील वंचितांना जमेल तितकी मदत करतो. बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे विचार व महती पोहोचविणे हे माझे कर्तव्य होते व ते मी पार पाडले.-अनिल सगानेप्रेरणा सात्त्विकतेचीमहात्मा गांधी यांचे सर्व विचार जर प्रत्यक्ष आयुष्यात अंगिकारले तर सर्वच समस्या दूर होतील. गांधी विचारांचे जवळून अध्ययन केल्यामुळे मनातील समाधान अन् सात्त्विकतेची भावना वाढीस लागली आहे. गांधी यांच्याप्रमाणेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ असण्यावर माझा व सहकाऱ्यांचा भर असतो. गांधी प्रत्यक्षात जगणे हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे असे मी मानतो.-गणेश ढोबळेसाधे जीवन, उच्च विचारमहात्मा गांधी यांचे जीवनचरित्र जवळून अभ्यासले की डोळ्यासमोर झळकतो तो एक वाईट मार्गाकडे जाण्याच्या मार्गावर असलेला विद्यार्थी ते जागतिक मूल्यांची शिकवण देणारा महात्मा हा एक थक्क करणारा प्रवास. गांधी यांचे साधे जीवन, उच्च विचार या संस्कारांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. शिवाय गांधी यांचे मूल्य तरुणाईपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असतो.-पुरुषोत्तम कामडी