शाहूनगरमध्ये बालवाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:27 IST
अकोले : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शहरातील शाहूनगर या कष्टकरी वस्तीत प्रतिभा वाघमारे यांच्या घरात बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे.या वाचनालयासाठी ७५ पुस्तके दिली असून यात परिकथा, रामायण, महाभारत, विनोदी कथा, साने गुरुजींची पुस्तके, इसापनीती, मान्यवरांची चरित्रे अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे.
शाहूनगरमध्ये बालवाचनालय
अकोले : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून शहरातील शाहूनगर या कष्टकरी वस्तीत प्रतिभा वाघमारे यांच्या घरात बालवाचनालय सुरु करण्यात आले आहे.या वाचनालयासाठी ७५ पुस्तके दिली असून यात परिकथा, रामायण, महाभारत, विनोदी कथा, साने गुरुजींची पुस्तके, इसापनीती, मान्यवरांची चरित्रे अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे.प्रतिभा व हेरंब कुलकर्णी यांचा हा उपक्रम असून गत वेळी इस्लामपेठ येथे वाचनालय सुरु केले. आता तालुक्यात २५ बालवाचनालये सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. वाचनालय आरंभ प्रसंगी नगरसेविका किर्ती गायकवाड, प्रा. नंदकुमार रासने, शांताराम गजे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, डॉ. उमा कुलकर्णी, लक्ष्मण आव्हाड, माधव तिटमे, मनोज गायकवाड, वसंत मनकर, बाळासाहेब मालुंजकर, ज्ञानेश्वर सुर्वे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)