शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बालभारती : दोन पदांवरील नियुक्त्यांबाबत ढिलाई काम करणारेही तेच, तपासणारेही तेच

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

--------पुणे: राज्य सरकारच्या बहुसंख्य खात्यांमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या दोन पदांवर केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त्या केल्या जातात. राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेत मात्र गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पदांवर मंडळातीलच अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सरकारी आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त असावी, पारदर्शकता असावी या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारमध्ये ऑडिट जनरल हा स्वतंत्र विभाग आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारच्या ऑडिट जनरल विभागांपैकी एकाकडून दरवर्षी लेखापरिक्षण होत असते. येणारे पैसे व जाणारे पैसे अशा दोन्ही स्तरावर या दोन पदांकडून परिक्षण केले जाते. त्यासाठी या दोन्ही पदांवरील नियुक्त्या या विभागाकडून केल्या जातात. केंद्र सरकारचे अधिकारी आहेत तिथे राज्य सरकारकडून परिक्षण होत नाही व राज्य सरकारचे आहेत तिथे केंद्राकडून नियुक्त्या होत नाहीत.
बालभारती संस्थेकडून शालेय पाठ्यपुस्तकांची खरेदी व विक्री होत असल्यामुळे त्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ५०० कोटी रूपयांची आहे. त्यामुळे बालभारतीमध्ये वित्त व लेखाधिकारी तसेच अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी अशी दोन्ही पदे केंद्र सरकारकडून नियुक्त केली जातात. त्यापैकी अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदावर असलेले सुहास परळे जून २०१४ मध्ये निवृत्त झाले. वित्त व लेखाधिकारी असलेल्या सुहास कुलकर्णी यांची ऑगस्ट २०१४ मध्ये बदली झाली.
त्यानंतर या दोन्ही पदांवर स्थानिक अधिकार्‍यांमधूनच नियुक्ती केली जात आहे. बालभारतीमध्ये मॅनेजर, स्टॉक ॲण्ड डिस्ट्रीब्यूटर्स या पदावर काम करणारे ए. डी. गायकवाड यांच्याकडे केंद्र सरकारच्या वित्त व लेखाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बालभारतीत असिस्टंट फायनान्स ऑफिसर असलेल्या राजेंद्र पवार यांच्याकडे अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. गेल्या वर्षभरापासून हेच दोन अधिकारी केंद्र सरकारच्या ऑडिट जनरल विभागाकडून नियुक्त केल्या जाणार्‍या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या मुळ पदाचे काम सांभाळून ते हा अतिरिक्त कार्यभारही पहात आहेत.
यातील गंभीर बाब अशी आहे की गायकवाड व पवार यांच्याकडे बालभारतीमध्ये असलेल्या पदांवरून झालेले कामकाजच प्रामुख्याने केंद्र सरकारच्या पदांकडून तपासले जात असते. त्यामुळे त्यांच्या कामाचे तेच परिक्षण करीत आहे अशी स्थिती बालभारतीमध्ये गेले तब्बल वर्षभर आहे.

जोड आहे,----------------------------