शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी असलेल्या लसीचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेची गती मंदावली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. परंतु, २५ हजार लसीचाच पुरवठा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्वच केंद्रावरील लस संपली. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. जिल्ह्यात गुरुवारी १९५ पैकी ५५ केंद्रावर लसीकरण झाले.

ठळक मुद्देगुरुवारी ७,०३२ जणांचे लसीकरण : लसीचा साठा पुन्हा संपला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत दोन लाख ३७ हजार ४२५ जणांनी लस घेतली. ४५ पेक्षा जास्त वयाचे व सहव्याधी असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आरोग्य प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार डोस उपलब्ध मिळाले असते तर आतापर्यंत सुमारे चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. मात्र, आठवड्यातून दोन ते तीन दिवस सलग लसीकरण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी केंद्र बंद ठेवावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी असलेल्या लसीचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेची गती मंदावली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. परंतु, २५ हजार लसीचाच पुरवठा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्वच केंद्रावरील लस संपली. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. जिल्ह्यात गुरुवारी १९५ पैकी ५५ केंद्रावर लसीकरण झाले. चंद्रपूर शहरातील १३ पैकी ५ केंद्रावर लसीकरण झालेे. यामध्ये ७ हजार ३२ जणांनी लस घेतली. चंद्रपुरातील १३ केंद्रांवर सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. कर्मचारीच न आल्याने त्यांना परत जावे लागले.जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यात सुमारे १९४ केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, मोहिमेच्या पहिल्या दिवसापासूनच तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मागणीनुसार कधीच पुरवठा झाला नाही. दोन दिवस झाले की केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की येत आहे. मागील आठवड्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. मात्र केवळ २५ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात प्रत्येक केंद्रावर लस पाठविण्यात आली. गुरुवारी बहुतांश केंद्रावरील लस संपली.

चिमूर तालुक्यातील केंद्र राहणार सुरूचिमूर तालुक्यात दिलेल्या साठ्यापैकी काही साठा शिल्लक आहे. त्यामुळे ज्या केंद्रावर साठा शिल्लक आहे त्या केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रे बंद राहणार आहेत. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु, बूस्टर डोससाठी त्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस