जवाहर नवोदय परीक्षेसाठी ११४९ बसले विद्यार्थी
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
हदगाव : तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रावर एकूण ११६६ पैकी ११४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यासाठी केंद्रप्रमुखासह ६३ तालुकाबा शिक्षकांनी कर्तव्य बजावले़ बैठे पथकासाठी महसूल विभाग प्रत्येक केंद्रावर उपस्थित होते़ कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडल्या़
जवाहर नवोदय परीक्षेसाठी ११४९ बसले विद्यार्थी
हदगाव : तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रावर एकूण ११६६ पैकी ११४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यासाठी केंद्रप्रमुखासह ६३ तालुकाबा शिक्षकांनी कर्तव्य बजावले़ बैठे पथकासाठी महसूल विभाग प्रत्येक केंद्रावर उपस्थित होते़ कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडल्या़जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत झाली़ एकूण ११६ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी अनुपस्थित होते़ तालुक्यातील जि़प़ शाळा व खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यासाठी तालुक्यात तीन परीक्षा केंद्राची नियुक्ती केली होती़ जि़प़ हायस्कूल हदगाव केंद्रावर ३६६ पैकी ६ विद्यार्थी अनुपस्थित होते़ विवेकानंद माध्यमिक शाळा ४१८ पैकी ६ अनुपस्थित तर पंचशील हायस्कूल केंद्रावर ३८२ पैकी ५ विद्यार्थी अनुपस्थित होते़ या केंद्रावर डी़आऱहोनपारखे, पांचाळ व बेग केंद्रप्रमुख म्हणून उपस्थित होते़ गार्डींगसाठी हि़नगर तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते़ बैठे पथकासाठी पुरवठा अधिकारी व्ही़एम़ नरवाडे, मंडळ अधिकारी सी़पी़कंगाळे, तलाठी गाडे, गरूडकर, मोरे उपस्थित होते़फिरते पथकाचे प्रमुख बी़आय़ येरपुलवार यांनी प्रत्येक केंद्राला भेट देत सुरळीत परीक्षा होण्यासाठी नजर ठेवून होते़ या परीक्षेत मिरीट यादीप्रमाणे ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण विनामुल्य विद्यार्थ्यांना भेटते़