शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! अधिकाऱ्याचा iPhone धरणात पडला; ३ दिवस पंपाने लाखो लीटर पाणी उपसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 12:10 IST

कोयलीबेडा ब्लॉकचे फूड विभागाचे अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते.

कांकेर - छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात अजब प्रकार पाहायला मिळाला आहे जो ऐकून तुम्हालाही संताप येईल. पंखजूरमध्ये एका अन्न निरीक्षकाचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी लाखो लिटर धरणातील पाणी वाया घालवले आहे. एका फोनसाठी दीड हजार एकर शेतजमीन जी सिंचनाखाली आली असती तितके पाणी काढण्यात आले. इतके करूनही अधिकाऱ्याचा मौल्यवान मोबाईल सापडला मात्र आता तो खराब झाला आहे.

कोयलीबेडा ब्लॉकचे फूड विभागाचे अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. खेरकट्टा पर्लकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर १५ फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल पडला. अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. चांगले पोहणारे उतरले. मात्र त्यात केवळ अपयशच आले, त्यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ३० एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.

मात्र, जलाशयातून सातत्याने पाणी उपसा होत असल्याची बाब वरपर्यंत पोहोचल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पंप बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा शोध घेतला असता मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला होता. अंदाजानुसार, गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग २४ तास ३० हॉर्स पॉवर मशीनच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. त्या अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये काय होते? ज्यासाठी सिंचनासाठी वापरणारे पाणी एवढ्या प्रमाणात वाया घालवले असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.  

पाच फुटांपर्यंत पाणी उपसण्याची परवानगी दिली : एसडीओ दुसरीकडे या प्रकरणी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी राम लाल धिनवार यांचे म्हणणे आहे की, ५ फुटांपर्यंत पाणी उपसण्याची परवानगी तोंडी देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत १० फुटांपेक्षा जास्त पाणी काढण्यात आले आहे. मात्र, एवढ्या कडक उन्हाळ्यातही सिंचनाच्या पाण्याची नासाडी झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.