शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक प्रताप! महाभागांनी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवले; कारण ऐकून संताप येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:11 IST

बादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात

रायपूर - कांकेर जिल्ह्यात अधिकाऱ्याने लाखो लीटर पाणी वाया घालवण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात धरणातील पाणी विनाकारण उपसा केल्याची घटना घडली आहे. वन्यजीव ज्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात तिथे काही महाभागांनी ताजे मासे पकडण्याच्या हेतूने लाखो लीटर पाणी वाया घालवले. 

वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जशपूर जिल्ह्यातील बगिचा विकास गटातील बादलखोल वन रिझर्व्हमध्ये गायलुंगा गावाजवळ लाखो लीटर पाण्यासाठी स्टॉप डॅम बांधण्यात आला होता, मात्र उपद्रवी लोकांनी गेट उघडून लाखो लिटर पाणी बर्बाद केले. या धरणात सुमारे ६ फुटांपर्यंत पाणी असून धरणातून पाणी ओसंडून वाहत होते. धरणात ३०० मीटर लांबीपर्यंत पाणी होते. या अभयारण्यात असणाऱ्या वन्य प्राण्यांबरोबरच आजूबाजूच्या गावातील गुरेही उन्हाळ्यात येथे पाणी पिण्यासाठी येत असत, मात्र आता धरणातून सर्व पाणी वाहून गेले आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावांमध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाण्याच्या शोधात हत्ती गावात घुसण्याची भीतीबादलखोल वन्यजीव अभयारण्य, जो जशपूरचा भाग आहे, जिथे हत्ती मोठ्या संख्येने फिरत असल्याच्या बातम्या येतात. हत्तींचा कळप येथे नेहमीच ये-जा करत असतो. अशा स्थितीत स्टॉप डॅममधून पाणी वाया गेल्याने आता त्या भागात पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी आता गावाकडे येऊ शकतात. बादलखोलच्या या जंगलात अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, ज्यामध्ये हरीण, हिरणे, अस्वल, नीलगाय, वाघ अशा प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत.

मासेमारीसाठी पाणी घालवले वायापरिसरात राहणारे आदिवासी कधीच अशी कृत्ये करत नाहीत असे जाणकारांचे मत आहे. निश्‍चितच काही टवाळखोरांनी केलेले हे कृत्य आहे. कारण जंगलात राहणारा एक मोठा आदिवासी समूह उन्हाळ्यात पाण्यावर अवलंबून असतो आणि त्यांची मासेमारीची परंपरा म्हणजे बनशी खेळणे, जाळे टाकणे अशी आहे.  पाणी वाया घालवणे, वाहत्या पाण्यातून मासेमारी न करणे हे ते करणार नाहीत असं स्थानिकांनी सांगितले.